Categories: Uncategorized

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर चौक येथे आज सकाळी १०:३३ दरम्यान एका खासगी शाळेच्या स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परत येत असताना काळाखडक परिसराकडे जात होती. त्यावेळी बसमधून अचानक धूर बाहेर पडत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले असता तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी अग्निशमन केंद्रातील अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याची कार्यवाही सुरू केली. काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले.

या आगीमध्ये संबंधित स्कूल बसचे नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे. सदर घटनेच्या वेळी बसमध्ये विद्यार्थी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही कार्यवाही अग्निशमन विभागाच्या लीडिंग फायरमन निखिल गोगावले, फायरमन गणेश मुसळे, फायरमन संकेत पारेकर, फायरमन दीपक कोठे, ट्रेनी सब ऑफिसर ज्ञानेश्वर हाके, ट्रेनी फायरमन प्रसाद बागेकरी आणि वाहनचालक संजय बिस्किटे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

वाहनांमधून धूर येणे, जळण्याचा वास येणे, वायरिंगमध्ये बिघाड होणे किंवा अन्य कोणतीही असामान्य बाब निदर्शनास आल्यास वाहन तात्काळ सुरक्षित ठिकाणी थांबवावे आणि आगीची शक्यता भासल्यास त्वरित अग्निशमन विभागाच्या १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाकडून यावेळी करण्यात आले.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 week ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

2 months ago