Google Ad
Maharashtra crimes Pimpri Chinchwad

सांगवी, खडकी, भोसरीतील चार लाख किंमतीच्या १० मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक!

महाराष्ट्र 14 न्यूज : दि .०९ ऑगस्ट २०२० रोजी गुन्हे शाखा , युनिट १ चे पोलीस पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी सपोनि गणेश पाटील , पो.ना. सचिन उगले , पो.शि.गणेश सावंत , नितीन खेसे , विशाल भोईर यांचे पथकास भोसरी पोलीस स्टेशनचे हद्दीत रात्रगस्त घालुन चोरी , घरफोडी व फरार आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना देवुन आदेश दिले होते . त्यानुसार सदरचे पोलीस पथक भोसरी परीसरात फिरून रात्र गस्त घालत असताना पो.शि.गणेश सावंत व नितीन खेसे यांना बातमी मिळाली की , भोसरी ब्रीजच्या खाली , आळंदीरोड येथे दोन इसम मोटारसाकलीसह सशंयीत रित्या थांबलेले असुन ते रात्रीचे त्या ठिकाणी दिसत असतात .

मिळालेल्या माहीतीवरून सपोनि गणेश पाटील व स्टाफ यांचे पथकाने बातमीप्रमाणे खात्री करून भोसरी ब्रीजच्या खाली , सापळा लावुन मोठ्या सिताफीने स्वप्निल राजू काटकर , वय १९ वर्षे , रा.मोहनदास राजपुत चाळ , दिघीरोड , आदर्शनगर , भोसरी , पुणे तसेच राहुल मोहन पवार , वय १९ वर्षे , रा.मधुबन सोसायटी , क्रमांक २ , चक्रपाणी वसाहत , भोसरी , पुणे यांना पकडुन ताब्यात घेतले . तेव्हा त्यांच्या ताब्यात असलेल्या २ मोटार सायकली बाबत अधिक चौकशी करता त्या त्यांनी चोरून आणल्याचे उघड झाल्याने त्यांना मोटार सायकलीसह ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक तपास करता त्यांनी आणखीन ८ मोटार सायकली चोरल्याचे उघड झाले असुन सदरच्या ८ मोटार सायकली त्यांचेकडून जप्त करण्यात आल्या आहेत .

Google Ad

आरोपीकडून चार स्प्लेन्डर , तीन होन्डा अॅक्टीवा , एक पॅशन , एक शाईन व एक डी.ओ.मोपेड असा कि.रू .४ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . आरोपीकडे सदर मोटार सायकली बाबत अधिक तपास केला असता सदरच्या मोटार सायकली त्यांनी भोसरी , एम.आय.डी.सी. , खडकी , व सांगवी परीसरातुन चोरल्या असल्याचे उघड झाले आहे . जप्त करण्यात आलेल्या १० मोटार सायकलीपैकी ८ मोटार सायकली सांगवी, खडकी, भोसरी येथील गुन्ह्यातील असल्याचे उघड झाले आहे .

उर्वरीत २ मोटार साकयली पैकी हिरो होन्डा स्पेल्डर प्रो मो.सा.चे मुळ मालकास संपर्क साधला असता त्याने तक्रार द्यावयची नसलेबाबत कळविले आहे . तसेच दुसरी होन्डा डिओ मोपेड नं MH40E7423 ही नागपुरची असुन ती संगमनेर येथुन चोरीस गेलेली असुन तिचे बाबत अधिक पास सुरू आहे . यातील आरोपी हे गाड्या चोरायचे व दिवसभर गाड्या फिरवुन त्या गाड्या भोसरी येथील ब्रीजच्या खाली असलेल्या पार्कीगमध्ये लावुन घरी जात असे तसेच काही गाड्या आरोपी यांनी त्यांचे ओळखीचे लोकांना गाडीचे कागदपत्र नंतर देतो असे सांगुन विक्री केल्या असल्याचे उघड झाले आहे . सदरच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत . सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री संदिप बिष्णोई , अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पाकळे , पोलीस उप आयुक्त श्री सुधिर हिरेमठ , सहा . पोलीस आयुक्त श्री आर आर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील , पोलीस उप निरीक्षक कालुराम लांडगे , पोलीस कर्मचारी रविंद्र गावंडे , सचिन उगले , गणेश सावंत , विजय मोरे , विशाल भोईर , नितीन खेसे यांचे पथकाने केली आहे .

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

78 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!