महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ सप्टेंबर २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथे राबविणेत येत असलेल्या घरकुल योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठीची अंतिम मुदत ३० सष्टेंबर २०२१ पर्यंत वाढविणेत येत असलेची माहीती महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. या मुदतीत स्वहिस्सा रक्कम न भरणा-या लाभार्थींचा लाभ रद्द करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने या योजनेसाठी २०११ साली संगणक सोडतीद्वारे प्रतिक्षा यादी जाहीर केली होती. त्यामध्ये ४५६ लाभार्थ्यांना स्वहिस्सा र.रु. ५०,०००/- व उर्वरीत स्वहिस्सा र.रु.३,२६,०००/- भरण्यासाठी ३० ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामधील ४५६ पैकी १०२ लाभार्थींनी प्रथम स्वहिस्सा र.रु.५०,०००/- भरुन त्यापैकी ८३ लाभार्थींनी उर्वरीत स्वहिस्सा र.रु.३,२६,०००/- भरणा केला आहे. त्यातील उर्वरीत १९ लाभार्थींना उर्वरीत स्वहिस्सा र.रु.३,२६,०००/- भरणेसाठी ३० सप्टेबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे

तसेच ४५६ लाभार्थी पैकी ३५४ लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरता आली नाही त्यांना व प्रतिक्षा यादीतील ८६४ पैकी ज्या लाभार्थींनी प्रथम स्वहिस्सा भरणा केला आहे अशा २५ लाभार्थींना उर्वरीत स्वहिस्सा भरणेसाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेचेही महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. स्वहिस्सा रक्कम भरणेसाठी पात्र असणा-या व संगणकीय सोडतीत निवड झालेल्या लाभार्थींची यादी महापालिकेच्या
www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर तसेच झोपुडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करण्यात आली आहे.
70 Comments