महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०६ऑगस्ट २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि.०६ ऑगस्ट २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील २२० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २३७ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर ०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला यातील ०३ रुग्ण हे पिंपरी चिंचवड शहरातील ०१ रुग्ण हा पिंपरी चिंचवड शहरा बाहेरील आहे.
पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

6 Comments