Categories: Uncategorized

नवी सांगवीचे ‘संजय शितोळे’ यांनी सायकलवरून लंडन ते पॅरिस हा प्रवास २४ तासांत केला पूर्ण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील बांधकाम व्यावसायिक संजय शितोळे  यांनी सायकलवरून लंडन ते पॅरिस हा प्रवास २४ तासांत पूर्ण केला. लंडनमधील टॉवर ब्रिजपासून सुरू केलेले सायकलिंग दुसऱ्या दिवशी आयफेल टॉवर येथे संपले. निवडलेला घाटांचा रस्ता, कडकडीत गारठा, शेवटचे दोन तास पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ब्रिटिश व जर्मन सहकाऱ्यांसोबत त्यांनी हे अंतर पूर्ण केले.

शितोळे म्हणाले, “लंडन ते ग्रीनविच, केंट, अॅशडाऊन फॉरेस्ट या चढऊताराच्या नितांत रमणीय रस्त्याने घाम काढला. इंग्लिश चॅनेल न्यूहेवन येथून फेरी बोटीने पार करायला पाच तास लागले. फ्रान्समधील डीपी बंदरावर इंग्रजी न कळणाऱ्या फ्रेंच इमिग्रेशन ऑफिसरबरोबर वादावादीने ३० मिनिटे वाया गेली. पुढील प्रवास सोमे व्हॅली, नॉर्मडी या महायुद्धातील अनेक थरारक प्रसंगातील साक्षीदार असलेल्या निसर्गरम्य भूमीतून होता पण वेळेचे बंधन व चढ उताराने कस लागला. पॅरिसच्या उपनगरातून आयफेल टॉवरचे टोक पाहिल्यावर आनंद झाला.

शिल्लक ४५ मिनिटे वेळ व जीपीएस दहा किलोमीटर अंतर दाखवत होते. पाऊस जोरदार पडत होता. मात्र, प्रयत्नपूर्वक मन व श्वासाची लय जोडली गेली व आयफेल पॅरिस संजय शितोळे देशमुख यांनी लंडन ते पॅरिस हा ३३० किलोमीटर २४ तासात सायकलवरून पूर्ण केले.

पाऊस थांबत आला होता पण डोळ्यातून अश्रूधारा बरसत होत्या.” संजय शितोळे देशमुख हे लंडनमधील अनेक संस्थांशी संबंधित आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील व युरोपमधील सर्वोच्च शिखरे पार केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय सायकल मोहिमा केल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…

1 week ago

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 month ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

2 months ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 months ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago