Categories: Uncategorized

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘जॅंगो जेडी’ … चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित ‘

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाची जोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याच समीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅंगो जेडी असं शीर्षक  असलेल्या या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलं आहे.

फिल्म मिल प्रा.लि.प्रॉडक्शन्स या बॅनरखाली रोहित भागवत आणि हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एखाद्या सुरेख चित्राप्रमाणं भासावं असं जॅंगो जेडीचं लक्ष वेधून घेणारं मनमोहक पहिलं पोस्टर रसिकांच्या भेटीला आलं आहे. मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर नायक आणि नायिकेची रोमँटिक जोडी पोस्टरवर पहायला मिळते. या सिनेमात एक प्रेमकहाणी पहायला मिळणार असल्याचेही संकेत या पोस्टरवरून मिळतात. चित्रपटाचं शीर्षक जॅंगो जेडी असं का ठेवण्यात आलंय? याचं उत्तर पोस्टरमध्ये नसलं तरी चित्रपटात नक्कीच मिळणार आहे. प्रेमकथेच्या अनुषंगानं इतरही काही विषयांना या चित्रपटात स्पर्श करण्यात येणार असल्याचा अंदाजही शीर्षकावरून येतो. पोस्टर मधली ‘तुमच्यातला नायक’ ही टॅग लाइन दर्शवते की ही सर्वसामान्य तरुणाची नायक बनण्याची गोष्ट आहे.

हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाचं अतिशय अभ्यासपूर्ण दिग्दर्शन केलं असल्यानं काहीशी नावीन्यपूर्ण गोष्ट जॅंगो जेडी मध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपटात गौरी नलावडे, अभिनव सावंत सोबत आदित्य आंब्रे, योगेश सोमण, डॉ. निखिल राजेशिर्के, वरुण पनवार इ.कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

दिग्दर्शक हरदीप सचदेव यांनी यापूर्वी ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये परिणामकारक योगदान दिले असल्याने, जॅंगो जेडी या चित्रपटकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago