Google Ad
Maharashtra Sports

Mumbai : गुणवंत खेळाडूंना मदतीचा हात … खेळाडूंच्या पेन्शन योजनेसाठी प्रस्ताव सादर करा … महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागाने केले आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे, सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही योजना राबवत आहे. या योजनेच्या प्रस्तावासाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवासी असावा त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त केलेले असावा. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त / गुणवंत खेळाडूस खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे.

ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे या हेतुने केंद्र शासनामार्फत गुणवंत खेळाडू पेन्शन योजना सुरू करण्यात आली असून राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

Google Ad

भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे, सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही योजना राबवत आहे. या योजनेच्या प्रस्तावासाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवासी असावा त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त केलेले असावा. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त / गुणवंत खेळाडूस खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे.

ऑलिम्पिक / पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक दरमहा 20 हजार रुपये मानधन, सुवर्ण पदक विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) 16 हजार रुपये, रौप्य व कांस्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स) स्पर्धेत समाविष्ट असलेले खेळ प्रकार) 14 हजार रूपये, सुवर्ण पदक – कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स 14 हजार रुपये आणि रौप्य व कांस्य पदक – कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पँरा एशियन गेम्स 12 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.
https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!