Categories: Editor Choice

महाराष्ट्राची लोककला आणि पाककला जपणारी “इंद्रायणी थडी” दि. २५ जानेवारी ते २९ जानेवारी २०२३ ‘ गावजत्रा मैदान, भोसरी येथे

विसरू नका या घडीला …..येताय ना इंद्रायणी थडीला !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जानेवारी) : सन्मान नारीशक्तीचा… अभिमान भारतीय संस्कृतीचा… महाराष्ट्राची लोककला आणि पाककला जपणारी आपली “इंद्रायणी थडी”  दि. २५ जानेवारी ते २९ जानेवारी २०२३ ‘ गावजत्रा मैदान, भोसरी येथे आमदार महेशदादा लांडगेयांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंच आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दि.२५ जानेवारी रोजी सायंकाळी ०६ वा. करण्यात येणार आहे

भोसरी येथील गावजत्रा मैदानावर सुमारे १७ एकर जागेत हा महोत्सव होणार असून, एक हजारहून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. शेकडो महिला बचतगट, महिला संस्था, स्वयंसेवी संस्थांचा या जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरण आणि महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाला आवर्जुन भेट द्यावी आणि विविध कार्यक्रम, उपक्रम आणि उत्पादने खरेदीचा आनंद लुटावा. त्याद्वारे महिला सक्षमीकरण उपक्रमाला निश्चितपणे प्रोत्साहन मिळणार आहे.

यात असणार :-

– अभिनेता पुष्कर श्रोत्री प्रस्तूत होम मिनिस्टर. सहभागी महिलांना मिळणार आकर्षक बक्षीस

– ग्राम संस्कृतीसह ५० हून अधिक विविध मनोरंजनाचे कार्यक्रम

• मोफत बालजत्रा –

– भव्य श्रीराम मंदिर

– जॉब फेअर

• शिवकालीन शस्त्र प्रदर्शन –

नवीन मराठी चित्रपट ‘बांबू’ या चित्रपटाची टीम येतेय प्रेक्षकांच्या भेटीला…

भव्य – दिव्य प्रभू श्रीराम मंदिर आणि १००० स्टॉल बांधणीचे काम आज संपूर्ण झाली असून, उद्या २५ जानेवारी रोजी होणार या जय्यत महोत्सवाचे उद्घाटन. आपण आपल्या सहपरिवरासोबत नक्की या महोत्सवात सहभागी व्हावे व या जत्रेचा आनंद घ्यावा असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

इंद्रायणी थडी महोत्सवामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…

2 days ago

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

2 weeks ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

1 month ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

1 month ago