Categories: Editor Choice

नवी सांगवीतील सोनिगरा ज्वेलर्स च्या मकर संक्रातीनिमित्त हळदी कुंकू महा-उत्सवमध्ये सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक वाण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जानेवारी) : नवीन वर्षात जानेवारी महिन्यातला पहिला सण हा मकर संक्रांतीचा साजरा केला जातो. मकरसंक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमी पर्यंत घरोघरी हळदी कुंकुचे कार्यक्रम चालू असतात. या सणानिमित्त महिलांमध्ये तर मोठा उत्साह असतो. तर नववधूंसाठी हा सण खास असतो. या सणाला हळदी कुंकवाला वाण लुटण्याची रीत असते. त्यामुळे घरोघऱी हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात.

मग यंदाही हळदी कुंकवासाठी असाच एक आगळावेगळा हळदीकुंकू कार्यक्रम नवी सांगवी, कृष्णा चौक येथील ‘सोनिगरा ज्वेलर्स‘ यांनी आपल्या ज्वेलर्सच्या दालनात दि.२५ व २६ जानेवारी रोजी स. ११ ते सं. ०५ पर्यंत आयोजित केला आहे. त्यांनी आपल्या परिसरातील महिलांना भगिनींना हळदी कुंकू समारंभास आमंत्रित केले आहे.

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. स्त्रीला घराबाहेर पडायला बंधनं होती. पण या हळदीकुंकूच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःख जाणून घ्यायच्या. हळूहळू समाज प्रगत होत गेला तसतशी स्त्रीही स्वतंत्र झाली. पण हळदीकुंकवाची प्रथा मात्र आजही सुरूच आहे.

पिंपरी चिंचवड शहरात नवी सांगवी-पिंपळे गुरव परिसरात सोने चांदी च्या व्यवसायात प्रसिद्ध असलेले सोनिगरा ज्वेलर्स यांनी या मकर संक्रातीनिमित्त सोनिगरा ज्वेलर्स च्या वतीने हळदी कुंकू महा- उत्सवमध्ये सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक वाण अशी योजना त्या निमित्ताने परिसरातील महिलांकरीता ठेवण्यात आली आहे.

हळद-कुंकू लावणे, म्हणजे दुसर्‍या जिवातील श्री दुर्गादेवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे

होय.

** वाण देणे

वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे, म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वसनाच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago