Categories: Uncategorized

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये थेट या प्रवर्गाला.. महापाैर आरक्षण सोडतमुळे दिग्गजांना धक्का

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ जानेवारी : राज्यातील महापालिका निवडणुका झाल्या आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष या निवडणुकीत ठरला. आज महापाैर पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली असून अनेक दिग्गजांना धक्का बसताना दिसत आहे.

राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापाैर पदाच्या आरक्षणाची सोडत सुरू झाली आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच महापाैर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. महापालिका निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अनेक महापालिकांवर भाजपाची एक हाती सत्ता आली. मुंबई, कल्याण डोबिंवली आणि उल्हासनगर महापालिका थेट युतीच्या हातात गेल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका देखील भाजपाकडे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महापालिकांवर भाजपाची सत्ता आहे. सोलापूरमध्ये भाजपाने धमाकेदार कामगिरी केली. आरक्षण सोडत जाहीर झाल्याने राजकीय समीकरणे थेट बदलल्याचे बघायला मिळत आहे. अनेक इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरताना दिसत आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली–मिरज–कुपवाड, सातारा, अहिल्यानगर, धुळे, जळगाव महापालिकांच्यी आरक्षण सोडत जाहीर झाली असून अनेक दिग्गजांना धक्का बसला. अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापाैर असणार आहे. कोल्हापूर महापालिकेतही महापाैर पद हे ओबीसीसाठी आरक्षित असणार आहे. इचलकरंजीमध्येही ओबीसी महापाैर असेल. जळगाव महापालिकेचे महापाैरपद महिला ओबीसीसाठी आरक्षित असणार आहे.
सोलापूर, पुणे (महिला), पिंपरी चिंचवड , सांगली, नाशिक, धुळे, मालेगाव या मालिकांवर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघाली. या पालिकांवर ओपन प्रवर्गातील महापाैर असणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. दोन्ही महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. महापाैर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे.

कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण?

  • कल्याण डोंबिवली – एसटी
  • लातूर – अनुसूचित जाती (महिला)
  • जालना – अनुसूचित जाती (महिला)
  • ठाणे – अनुसूचित जाती
  • पनवेल – ओबीसी
  • इचलकरंजी – ओबीसी
  • अकोला – ओबीसी (महिला)
  • अहिल्याबगर – ओबीसी (महिला)
  • उल्हासनगर – ओबीसी
  • कोल्हापूर – ओबीसी
  • चंद्रपूर – ओबीसी (महिला)
  • जळगांव – ओबीसी (महिला)
  • मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
  • पुणे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)
  • छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग (महिला)
  • धुळे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)
  • अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)
  • भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग
  • मालेगाव – खुला प्रवर्ग (महिला)
  • मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग (महिला)
  • नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)
  • नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)
  • पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग
  • नाशिक – खुला प्रवर्ग (महिला)
  • नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
  • परभणी – खुला प्रवर्ग
  • सांगली-मिरज – खुला प्रवर्ग
  • वसई-विरार – खुला प्रवर्ग
  • सोलापूर – खुला प्रवर्ग
Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

5 days ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

6 days ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

7 days ago

सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा …! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…

1 week ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

3 weeks ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

4 weeks ago