Categories: Uncategorized

लोकनेते आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या स्मरणार्थ आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळु फुले नाट्यगृहात नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० नोव्हेंबर) : पंढरपूरची कार्तिक वारी, आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधीदिन सोहळा आणि ‘सकाळ’ पिंपरी -चिंचवडचा ३१ वा वर्धापनदिन यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन सोमवारपासून (ता. २०) केले आहे. त्याअंतर्गत आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ सोमवारी सायंकाळी पाच वाजता पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळु फुले नाट्यगृहात जयेश महाराज भाग्यवंत यांचे कीर्तन होईल. त्यांच्यासह शहरातील विविध भागात नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी आणि त्यांचे पूजक भागवत तथा वारकरी संप्रदायाचा पंढरपूर येथील कार्तिक वारी सोहळा सध्या सुरू आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधीदिन सोहळा पाच डिसेंबरपासून आळंदीत सुरू होत आहे. या दोन्ही सोहळ्यानिमित्त आणि ‘सकाळ’ पिंपरी-चिंचवडच्या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने कीर्तन महोत्सव होत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्यात ‘सकाळ’ने कीर्तन महोत्सव आयोजित केला, या माध्यमातून संतांची शिकवण देली जात आहे. अशीच परंपरा ‘सकाळ’ने कायम ठेवावी. आमदार लक्ष्मण जगताप यांच्य स्मृतिदिनानिमित्त सोमवार कीर्तन सेवा होत आहे.

– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजप

प्रवेशिका मिळण्याची ठिकाणे – ‘सकाळ’ पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालय, कोहिनूर बी झोन, पाचवा मजला, विजय सेल्सजवळ, पिंपरी – ९८८१०९९४३५ नटसम्राट निळू फुले नाट्यगृह : परशुराम सैद – 8888856027 संत तुकाराम मंगल कार्यालय (द्रौपदा) वाकड : गौरव – 9623153930 मा. नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांचे कार्यालय, चिंचवड – ७७१९०९२९२९ दिनेश ॲडव्हर्टायझिंग, निगडी प्राधिकरण – ८९७५७६१८६3 प्रशांत ऑटो केअर, नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळ, पिंपरीगाव – ९८२२६६००४६ गुरुकृपा बुक स्टॉल, भोसरी बीआरटी बसस्टॉपजवळ पुणे-नाशिक महामार्ग, भोसरी – ९८५००३९७११ अभय ॲडस्‌, चापेकर चौक, चिंचवड – ८९७५००२०९९ प्रतिबिंब फोटो स्टुडिओ, जुनी सांगवी, लक्ष्मीनगर – 9822343345 जिजाऊ डेअरी देवकर पथ, पिंपळे गुरव – 9881727779 किंगस्टाइल ड्रेसेस, नंदनवन कॉलनी, कृष्णा चौक, नवी सांगवी : 8087813814 अमृता कलेक्शन, दत्त मंदिर शेजारी, शिंदे वस्ती, रावेत – 9764095610 जगताप न्यूज पेपर एजन्सी, गणेश कामगार मंडळ, दत्तवाडी, आकुर्डी – 9922888864 दत्त न्यूज पेपर एजन्सी, वाकड – 9822332863 हॉटेल तत्त्व, दत्त मंदिर रोड, वाकड – 8007081001 समृद्धी ट्रॅव्हल्स, भूमकर चौक, वाकड, ऑस्कर मिसळच्या जवळ – 9960200402 संदीप कस्पटे जनसंपर्क कार्यालय, कस्पटे वस्ती, वाकड – 8421535111 भारती विनोदे जनसंपर्क कार्यालय, सोनचाफा बिल्डिंग, द्रौपदा लॉन्स समोर, हिंजवडी रोड, वाकड – 7028354599. अधिक माहितासाठी संपर्क – किरण कांबळे – 7387098897.

Maharashtra14 News

Recent Posts

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…

1 day ago

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 month ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 months ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago