Google Ad
Education

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; बोर्डाच्या परीक्षेचे शुल्क पुणे महानगरपालिका भरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ डिसेंबर) : शहरातील यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे महानगर पालिकेने मोठा दिलासा दिला आहे . शिक्षण विभागाच्या शाळातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क महापालिका भरणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पुणे महानगरपालिकेत एकूण 44 माध्यमिक शाळांच्या मधून 4 हजार 392 विद्यार्थी परीक्षा देणारा आहेत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला415 रुपये व तंत्रशाळेतील 200विद्यार्थ्यांचे प्रति 525असे दहावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरावे लागणार आहे. तर महापालिकेच्या शिक्षण विभागातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील 449 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. या सर्वांचे वाणिज्य शाखेचे 430रुपये आणि विज्ञान शाखेसाठी प्रति 490 रुपये परीक्षा शुल्क भरले जाणार आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!