Google Ad
Editor Choice

नवी संगवी येथील न्यू मिलेनियम स्कूल मधील महिला शिक्षकांनी हिरव्या रंगातील साड्यांचा पेहराव करत साकारलं … दुर्गेचं हे एक आगळे हिरवे रूप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ सप्टेंबर) : नवरात्रौत्सवातील पाचव्या माळेला नवी संगवी येथील न्यू मिलेनियम स्कूल मधील महिला शिक्षकांनी हिरव्या रंगातील साड्यांचा पेहराव केला होता.

नवरात्रीचा पांचवा दिवस… आजचा रंग हिरवा… हिरवा रंग हा निसर्गाचा… ऋतू बदलाचा… शेतकऱ्यांचा.. सुपिकतेचा… हा रंग आपल्या डोळ्यांसाठी उत्तम असतो. हा रंग पाहिला कि नैराश्य आलेला मेंदू ताजातवाना होतो… म्हणून डॉक्टर/ डाएटिशिअन आपल्याला हिरव्या green पालेभाज्या, सलाड खायला सांगतात.. हिरवा रंग आपल्याला नवीन ऊर्जा देतो म्हणून तर ट्रॅफिक सिग्नलचा तिसरा रंग हा हिरवा असतो.

Google Ad

नयनांना शांतवून सुखावणारा. सृजनाचं, नवोन्मेशाचं, समृद्धीचं प्रतिक असणारा. एकाच वेळी शांतवणारा आणि चेतना जागवणारा, आयुष्याच्या अस्तित्वाचा रंग आहे हा हिरवा. निसर्गात सर्वाधिक आढळणारा.

हिरवा रंग डोळ्यासाठी ही उत्तम आहे. हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते.हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा रंग. म्हणूनच शांतता आणि संतुलितपणाचा संगम तुम्हाला यात पाहायला मिळेल. तसेच हा रंग निर्मितीचा, आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा आहे असं म्हटलं जातं. इतर कोणत्याही रंगापेक्षा या रंगाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो. म्हणूनच घराच्या सजावटीत हिरव्या रंगांचा वापर जास्तीत जास्त करायला काही हरकत नाही. हिरव्या रंगाने घरात प्रसन्नता निर्माण होत असते.

महिला शिक्षकांच्या रूपाने दुर्गेचं हे एक आगळे हिरवे रुप आज स्त्री शक्तीचा जागर करताना या हिरव्या रुपाचीही आठवण ठेऊया !

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!