महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ एप्रिल २०२६ :* बालवाडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर मुलांमध्ये आत्मविश्वास, सृजनशीलता आणि शिकण्याची आवड निर्माण करणे गरजेचे असते. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन शिक्षण समितीच्या सभापती रविना आंगोळकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने पीसीएमसी पब्लिक स्कूल, साई जीवन, जाधववाडी (कन्या व मुले शाळा क्र. ८७) येथे बालवाडीतून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी शिक्षण समितीच्या सभापती रविना आंगोळकर बोलत होत्या.
यावेळी विधी समिती सभापती सुजाता बोराटे, नगरसदस्य राहुल जाधव यांच्यासह महापालिकेच्या प्रशासन अधिकारी संगिता बांगर, शाळेचे मुख्याध्यापक जयश्री गळीतकर, मुख्याध्यापिका मृगनयनी चव्हाण, पर्यवेक्षक प्रमिला जाधव यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षिका, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
सभापती रविना आंगोळकर म्हणाल्या, आजचा दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असून, पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे. पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यकाळ घडविणे शक्य आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जपून सातत्याने प्रगती साधावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी विधी समिती सभापती सुजाता बोराटे, नगरसदस्य राहुल जाधव, प्रशासन अधिकारी संगिता बांगर यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्य़क्रमाचे सूत्रसंचालन धमेंद्र भांगे यांनी केले.
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…