Categories: Uncategorized

पावसाळ्या आधी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करा … पिंपरी चिंचवड मनपा जनसंवाद सभेत नागरिकांच्या सूचना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ मे) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या प्रत्येक महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी,सूचना जनसंवाद सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिका-यांनी  यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा  क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ४१ तक्रारवजा सूचना मांडल्या.  यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे ८, ४, ०, ६, २, ३, १३ आणि ५ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

            अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप,  सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषवले.  क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे,उमेश ढाकणे  उपस्थित होते.

आज पारपडलेल्या  जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. पावसाळ्या आधी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करण्यात यावी तसेच  रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे, रस्त्यांची साफसफाई करण्याबाबत, पाणीपुरवठा सुरळीतपणे करावा. नादुरुस्त पदपथ दिवे दुरुस्थ करण्यात यावे, पाणी गळती बाबत आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात  अशा सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago