Categories: Editor Choice

शहरामध्ये निर्जंतुकीकरण करुनच पाणीपुरवठा; कोणतीही फिल्टर मशीन बंद नाही !  – नागरिकांनी खोट्या ‘एसएमएस’ वर विश्वास ठेऊ नये; महापालिका जलशुद्धीकरण केंद्राकडून आवाहन

– शहरामध्ये निर्जंतुकीकरण करुनच पाणीपुरवठा; कोणतीही फिल्टर मशीन बंद नाही !

– नागरिकांनी खोट्या ‘एसएमएस’ वर विश्वास ठेऊ नये; महापालिका जलशुद्धीकरण केंद्राकडून आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ जानेवारी– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरण करुन विविध शास्त्रोक्त प्रक्रियांचे अवलंब करुनच शहरामध्ये पाणीपुरवठा केला जातो. महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारी टी.सी.एल पावडर वापरण्यात येते.

नागरिकांना शुध्द पाणी मिळण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंब करण्यात येत असून शहरामध्ये जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा व त्यामध्ये बिघाड झाल्याचे ‘एसएमएस’ सध्या नागरिकांपर्यंत पोहोचत असून पाणी निर्जंतुकीकरण न करताच सोडण्यात येणार असल्याचेही त्याद्वारे सांगण्यात येत आहे. असे एसएमएस खोटे व जाणीवपूर्वक पसरविण्यात येत असून अशी कोणतीही परिस्थिती नाही. जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर हाऊस सुरु असून नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, असे जलशुध्दीकरण केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी खोट्या ‘एसएमएस’ व माहितीवर विश्वास ठेवू नये !
“सध्या शहरामध्ये फिल्टर मशीन बंद असल्याचे व निर्जंतुकीकरण न करता पाणी सोडण्यात येणार असल्याचे ‘एसएमएस’ पाठविले जात असून यामध्ये कोणत्याही प्रकारे सत्यता नाही. जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारी टी.सी.एल पावडर वापरण्यात येत आहे. नागरिकांना शुध्द पाणी मिळण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंब करुनच पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी खोट्या माहितीवर विश्वास न ठेवता आपणास येणारे पाणी अशुध्द असल्याचा संभ्रम दूर करावा. सध्या पाठविल्या जाणाऱ्या खोट्या ‘एसएमएस’ पाठविणाऱ्याचा शोध घेवून संबंधितांवर सायबर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.”
-प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता (१), पाणीपुरवठा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…

1 day ago

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

2 weeks ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

4 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

1 month ago