Categories: Editor Choice

चिंचवडच्या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबीयांच्याच सदस्याला भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जाने.) : चिंचवड मतदार पोटनिवडणुकीबाबत आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. या बैठकीला शहाराध्यक्ष महेश लांडगे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, शंकर जगताप आदी उपस्थितीत होते.

तसेच चिंचवडच्या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबीयांच्याच सदस्याला भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीकरीता उमेदवार कोण असावा, याचा निर्णय आमची भाजपची कोअर कमिठी करीत असते. त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. तुमच्या प्रश्नांमध्ये पिंपरी चिंचवड नागरिकांचं आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं उत्तर आहे. तसेच लक्ष्मण जगताप यांच्या कुटूंबातीलच सदस्यांना उमेदवारी देण्याबाबत कुणाचं दुमत नसणार असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

आजची जी बैठक पार पडली, या बैठकीत उमेदवाराबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. उमेदवार ठरविण्याचा अधिकार भाजपच्या कोअर कमिठीला आहे. ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मात्र या निवडणुकीबाबत आम्ही गाफील राहणार नाहीत. त्यामुळे याची तयारी आम्ही सुरू केली आहे. असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

12 आणि 28% रद्द, आता फक्त 5 आणि 18% GST; अनेक वस्तू स्वस्त होणार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 04 सप्टेंबर :- सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि…

3 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निर्माल्य संकलन मोहिमेला पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद … सात दिवसांत जवळपास ५२ टन निर्माल्य संकलित….

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी,…

3 days ago

Breaking News : मनोज जरांगेंचा मोठा विजय.! ‘या’ सर्व मागण्या झाल्या मान्य… महायुती सरकारमुळे मराठयांचा आजचा दिवस सोन्याचा

महाराष्ट्र 14न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या…

4 days ago

मनोज जरांगेंची जी मागणी मान्य केली ते ‘हैदराबाद गॅझेट’ नेमकं आहे तरी काय ?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानी…

4 days ago

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे …. प्रकल्प अहवालाचे सादरीकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रस्तावित…

5 days ago

प्रेक्षकांची मने जिंकणारी हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन

'महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31ऑगस्ट  :- या सुखानो या' म्हणत टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकलेली आणि आपल्या अभिनय…

6 days ago