चंद्रकांत पाटील यांनी घेतली ठाकरे गटाच्या माजी आमदाराची शनिवारी भेट घेतली. ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या निवासस्थानी जाऊन चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांत मोकाटे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. मात्र ही भेट राजकीय नसल्याचं चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण करण्यात आले. परंतु ही राजकीय भेट नव्हती तर कशासाठी भेट झाली? या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. ठाकरे गटाला पुन्हा धक्का देण्याची तर ही तयारी ना? अशी चर्चा होत आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून आपला अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी त्यावेळी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची समजूत काढून त्यांना आपल्या रॅलीमध्ये सहभागी करून घेतले होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या आमदाराची भेट घेतली, हे काही नवीन नाही.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात झाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात भाजपमध्ये मोठे फेरबदल करण्याची घोषणा केली होती. कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत. येत्या ३० तारखेपर्यंत पुणे भजपत मोठे बदल होतील. २०२४ पर्यंत भाजपात अनेक मोठे नेते येतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर दोनच दिवसांत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या आमदाराची भेट घेतली. यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
राजकारणापलीकडची सामाजिक बांधिलकी जपत आमदार शंकर जगताप यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात! ३० टन जीवनावश्यक…
पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…