Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोना महामारीमुळे विविध सामाजिक कार्य करत सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार वाढदिवस साजरा करणार!

महाराष्ट्र 14 न्यूज : सामाजिक कार्यकर्ते आणि मराठवाडा जनविकास संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजातील तळागाळातील अंध, अपंग, सफाई कामगार तसेच गरजू कुटूंबांना २२५ किराणा किटचे वाटप केले. कोरोनाच्या संसर्गाचे संकट असल्याने वाढदिवस (१४ ऑगस्ट ) न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराममहाराजांच्या वचना प्रमाणे श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ,श्रीक्षेत्र सावरगाव अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्य करण्यात आले. तसेच केवळ लागवडीचे काम केले नसून, लावलेल्या झाडांना पाणी देण्याची सोय करत एक नवीन योगदान दिले आहे. तसेच ५०० वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले

Google Ad

“देव देश आणि धर्मासाठी
प्राण घेतले हाती!”

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे सुरू असलेल्या मंदिरासाठी मदत म्हणुन १,००००० (एक ,लाख रुपये) धनादेश देण्यात आला.

“सांगाती फाउंडेशन” या संस्थेने “कामगार आणि कारखानदार यांची सांगड” हा उपक्रम सुरू करण्यात आला. याच माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील सुतार, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी तसेच हेल्परसह अनेक क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे. त्यातंच अशा मजूरांना “कोविड कवच” (१० बंधु भगिनी) यांना विमा पॉलिसीचे संरक्षण पुरवण्यात आले. तसेच याचबरोबरीने तीनशेहून अधिक शेतकरी बांधवांचे “पीएम किसान योजनेचे ” मोफत फाॅर्म भरुण दिले आहेत. वाढदिवसानिमित्त विजय वडमारे यांच्या सहकार्याने अनेक अंध आणि अपंग व्यक्तींची सेवा करताना या जनसेवकाने मोफत ” शाॅप अॅक्ट तसेच उद्योग आधार” काढून दिले आहेत. याबरोबरच तब्बल पस्तीस विधवा महिलांसाठी “संजय गांधी निराधार पेन्शन योजने” च्या माध्यमातून पेन्शन सुरू करण्यात आले.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!