Google Ad
Education Maharashtra

राज्यात १५ हजार ५१५ MPSC ची पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६जुलै) : महाराष्ट्रात २०१८ पासून रिक्त असलेली विविध श्रेणीतील रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. राज्यातील एकुण १५ हजार ५१५ पदे भरण्यासाठी वित्त विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेमुळे आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केले. ही रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याच्या अनुषंगाने उपाययोजना करत ठोस निर्णय घेण्यात आला. या भरतीसाठी मान्यता देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी विधानसभेत सभागृहाला सांगितले.
परीक्षांचे निकाल जलद गतीने लावण्यासाठी उपाययोजना करताना ठोस निर्णय घेण्यात आले. त्यासाठीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या एकुण १५ हजार ५१५ रिक्त पदांमध्ये गट अ, ब आणि क श्रेणीतील रिक्त पदांचा समावेश आहे. अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडून या पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. एमपीएससीची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. या पदांच्या भरतीला आता वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये ही भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असेही अजितदादांनी सभागृहाला सांगितले.

Google Ad

कोणत्या गटाअंतर्गत किती जागा ?
गट जागा
अ ४४१७
ब ८०३१
क ३०६३
एकुण जागा – १५ हजार ५१५

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!