Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड मनपाच्या दिव्यांग कल्याणकारी योजनांचा लाभ शहरातील लाभार्थ्यांनी घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक १० जुलै २०२३:-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

मर्यादित कालावधीकरीता असणा-या योजनेमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय १ ली ते वय वर्ष १८ पर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती स्वरुपात दरमहा २ हजार याप्रमाणे वार्षिक २४ हजार रुपये, तर ५ वी ते १८ वर्षे वयोगटातील दिव्यांगामुळे शाळेत जाऊ न शकणा-या दिव्यांग मुलांमुलींना दरमहा ३ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना १२ वी नंतरचे वैद्यकीय प्रथम वर्षासाठी एम. बी. बी. एस / बी. ए. एम. एस / बी. एच. एम. एस / बी. डी. एस / बी. यु. एम. एस / बी. आर्किटेक / बी. पी. टी. एच / बी. फार्म / बी. व्ही. एस. सी आणि अभियांत्रिकी पदवी यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रथम वर्षासाठी एकदाच जास्तीत जास्त १ लाख रुपये अर्थसहाय्य तसेच महापालिका हद्दीत वास्तव्यात असलेल्या दिव्यांग व्यक्तींना महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत आयटीआय मार्फत एम. के. सी. एल अंतर्गत येणारे एम.एस. सी. आय. टी / डी. टी. पी / टॅली व के.एल. आय. सी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मानव हिताच्या दृष्टीकोनातून काम करणा-या मतीमंद, अंध, कुष्ठरोगी, मुकबधीर, वृद्धाश्रम, अनाथालय अशा संस्थांना जास्तीत जास्त २ लाख ९९ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच वर्षभर खुल्या असणाऱ्या योजनांमध्ये दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी बॅंकेकडील मंजूर कर्जाच्या ५०% अथवा जास्तीत जास्त १ लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणा-या मनपा हद्दीतील नोंदणीकृत संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तींच्या पालकांस दरमहा ३ हजार रुपये, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कुष्ठपिडीत व्यक्तींना दरमहा ३ हजार रुपये, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार, लाभार्थींच्या गरजांनुसार, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अत्याधुनिक उपकरणे घेणेबाबत १ लाख रुपये मर्यादेपर्यंत एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय – दिव्यांग कल्याणकारी योजनेतर्गत प्रती महिना २ हजार पाचशे रुपये, संत गाडगे महाराज – दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी १ लाख रुपये एकदाच तर दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा नवविवाहित जोडप्यास २ लाख रुपये एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येणाऱ्या या दिव्यांग कल्याणकारी योजनांचा लाभ शहरातील लाभार्थ्यांनी घ्यावा आणि अर्ज दाखल करावेत असे आवाहन महानगरपालिकेचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.

वरील नमूद केलेल्या सर्व घटक योजनांचे अर्ज पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवरून मुखपृष्ठावरील ‘’समाज विकास विभाग योजना’’ या पर्यायावरून दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…

1 week ago

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 month ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

2 months ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 months ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago