Categories: Editor ChoiceSports

पुण्याचा पठ्ठ्या अभिजीत कटके ‘हिंद केसरी’; पटकावली मानाची गदा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०८ जानेवारी) : तेलंगणामधील हिंद केसरी स्पर्धेतील फायनलमध्ये कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव केला आहे. अभिजीत कटके विजयानंतर पुण्यात एकच जल्लोष पहायला मिळत आहे. अभिजीतने सामन्यात सोमवीरला एकही संधी दिली नाही आणि सामना 4-0 ने जिंकला आहे. 

भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा म्हणजे हिंद केसरी. या हिंद केसरी सामन्याचा अंतिम सामना रविवारी खेळला गेला. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटके (Abhijit Katke) याने हरियाणाच्या सोमवीरला (somveer) टिकू दिलं नाही. हरियाणाच्या सोमवीर याला 4-0 अशा फरकाने लोळवत खिताबावर नाव कोरलं आहे.

अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकवेळा महाराष्ट्र केसरी राहिला आहे. हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे जाते की हरियाणाकडे अशी उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र, अभिजीतने धोबीपछाड देत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 2017 मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अभिजित कटके याने महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता.

दरम्यान, अखिल भारतीय ॲमॅच्युअर रेसलिंग फेडरेशनतर्फे हिंद केसरी हा किताब देण्यात येतो. हा किताब या फेडरेशन तर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणाऱ्या विजेत्यास दिल्या जातो. याआधी 2013 साली पुण्याच्या अमोल बराटेने (Amol Barate) हा किताब पटकावला होता. त्यानंतर आता अभिजीत कटके याने पुण्याचा अभिमान आणखीन उंचावल्याचं पहायला मिळतंय.

Maharashtra14 News

Recent Posts

अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरास ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद पहिल्याच दिवशी ४८,७६३ जणांनी घेतला लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ फेब्रुवारी : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य…

4 days ago

द न्यु मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जंयती उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 18/2/2025, पिंपळे गुरुव : प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यु मिलेनियम इंग्लिश…

2 weeks ago

लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडपट्टी धारकांच्या हक्काच्या घराचा “सदनिका हस्तांतरण सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी…

2 weeks ago

सावधान ! आता… पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर

सावधान ! पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी…

3 weeks ago