Google Ad
Uncategorized

पुणे येथे मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत देवांग कोष्टी समाजाचा … वधु वर परिचय ऑनलाईन महामेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ डिसेंबर) : देवांग कोष्टी समाज पुणे आयोजीत वधु वर परिचय ऑनलाईन महामेळावा शनिवार दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी श्री चौंडेश्वरी मंदिर, पिंपळे निलख, पुणे येथे मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला..

वधु वर यादीचे विमोचन प्रमुख पाहुणे अखिल भारतीय देवांग देवांगण कोष्टी कोष्टा फेडरेशन चे अध्यक्ष श्री अरुण वरोडे, उद्योजक श्री विजयशेठ जगताप, आणि महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ चे अध्यक्ष श्री प्रकाश सातपुते यांचे हस्ते करण्यात आले.

Google Ad

यावेळी माजी पोलीस अधिकारी श्री श्रीकांत तरवडे, मिलिंद कांबळे, उत्तम म्हेत्रे, मल्हारराव ढोले ई. उपस्थीत होते.
यावेळी पाहुण्यांनी वधु वर मेळाव्याची गरज व आवश्यकता याविषयी आपले विचार मांडले.

देवांग कोष्टी समाज पुणेचे अध्यक्ष श्री सुरेश तावरे यांनी आपले मनोगत केले तसेच समाजाच्या वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेतला. कार्याध्यक्ष श्री अशोक भुते आणि सहसचिव श्री सुनील डाहाक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, खजिनदार श्री भगवान गोडसे यांनी सुत्रसंचलन केले, *सचिव श्री सुनील ढगे यांनी उपस्थितांचे तसेच मेळावा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानले. मेळावा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सल्लागार यांनी अथक परिश्रम घेतले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!