Google Ad
Uncategorized

रेडझोनबाधित अवैध निवासी बांधकामाचा शास्तीकर रद्द करा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे नगरसेवक प्रविण भालेकर यांची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.२९ डिसेंबर) : पिंपरी चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. शहरात उपजिवीकेसाठी आलेल्या गोरगरीब नागरिकांनी कष्टाच्या पैशातुन घरे बांधली आहेत. त्या घरांना भरमसाठ शास्तीकराची आकारणी केली जात आहे. नागरिकांना हा दंड परवडणारा नसून मालमत्ता कर थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील रेडझोन बाधीत निवासी घरांचा शास्तीकर पूर्णतः माफ करावा अशी आग्रही मागणी नगरसेवक प्रविण भालेकर यांनी केली .

मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी समक्ष भेटून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नगरसेवक प्रविण भालेकर यांनी निवेदन दिले असून निवेदनात म्हंटले आहे की, रेडझोन बाधित अनधिकृत बांधकामे गुंठेवारी कायद्याने नियमितीकरणास अपात्र ठरत असल्याने वर्षानुवर्षे रेडझोन भागामध्ये वास्तव्यास असलेल्या सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांवर अवैध बांधकाम शास्तीकराची टांगती तलवार कायम आहे. रेडझोन जाहीर होण्यापूर्वीच यातील अनेक मिळकती लघुउद्योग, कामगार व स्थानिक नागरिकांनी विकसीत केल्या आहेत.

Google Ad

अश्या परिस्थिती मध्ये २००८ साला पासून लावलेला शास्तीकर अयोग्य आहे. शास्ती करामुळे अनेक नागरिकांच्या मिळकत कराची थकबाकी घर आणि जागेच्या किमती पेक्षाही अधिक झाली आहे. त्यामुळे रेडझोन भागातील नागरिक हवालदिल झाले आहेत. रेडझोन भागातील अनधिकृत बांधकामे नियमित होत नसल्याने येथील मिळकतीवरील शास्तीकर पूर्णतः माफ करून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी केली. यावेळी नगरसेवक प्रविण भालेकर यांच्या राष्ट्रवादी दिनदर्शिका -२०२२ चे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!