Google Ad
Editor Choice india

यावर्षीचा स्वतंत्रदिन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यासाठी ठरणार खास…

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन भारतात ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. दरम्यान, यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास ठरणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपद सांभाळल्यापासून सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. त्याबरोबरच लाल किल्ल्यावर सर्वाधिकवेळा तिरंगा फडकवणारे ते देशाचे चौथे पंतप्रधान ठरतील. तसेच लाल किल्ल्यावर सर्वाधिक सात वेळा ध्वजवंदन करणारे ते पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान ठरतील.

लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवण्याचा विक्रम देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावे आहे. त्यांनी त्यांनी १९४७ ते १९६३ या काळात एकूण १७ वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला होता. तर या क्रमावारीत इंदिरा गांधी दुसऱ्या क्रमांकावर आहेत इंदिजा गांधींनी १९६६ ते १९७७ आणि १९८० ते १९८४ या काळात एकूण १६ वेळा तिरंगा फडकवण्याचा मान मिळवला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा मान १० वेळा मिळवला.

Google Ad

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सलग सहा वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला होता. वाजपेयी हे आतापर्यंत सर्वाधिकवेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणारे बिगरकाँग्रेसी पंतप्रधान आहेत. आता त्यांचा हा रेकॉर्ड मोदी मोडीत काढतील. वाजपेंयींशिवाय एच.डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांनी प्रत्येकी एक वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. तर व्ही.पी सिंह यांनाही एकदा लाल किल्यावरून तिरंगा फडकवण्याचा मान मिळाला.

याशिवाय राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव या्ंना लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा मान प्रत्येकी दोन वेळा मिळाला. तर लालबहादूर शास्त्री यांनी दोन वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. मोरारदी देसाई यांना दोन वेळा तर चौधरी चरण सिंह यांना लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा मान एक वेळ मिळाला. मात्र गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर या पंतप्रधानांना मात्र लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

24 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!