Categories: Uncategorized

तरुण-तरुणींना मिळणार ‘ऑन द स्पॉट’ हक्काची नोकरी- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 मे (प्रतिनिधी)  : पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवार, दिनांक १४ मे रोजी सांगवी येथे ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग (पुणे), प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा होणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल येथे सकाळी ९  वाजल्यापासून या मेळाव्याला सुरुवात होईल. मेळाव्याचे उद्घाटन  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रसादजी लोढा यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात मुख्यत्वे पुणे, पिंपरी-चिंचवड व चाकण तसेच महाराष्ट्रातील विविध औद्योगिक पट्ट्यातील नामवंत आयटी, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल आणि बँकिंग क्षेत्रातील नामांकित कंपन्या थेट मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करणार आहेत.

पाचवी ते  दहावी, तसेच बारावी, पदवीधर, पदव्युत्तर तसेच आयटीआय आणि डिप्लोमाधारक पात्र उमेदवारांना यात सहभागी होता येईल. उमेदवारांनी आपल्या बायोडाटा आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ५ हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी  ९९२१०९९२१४,  ७३५००७९९५५,  ९८५०१७११११ या क्रमांकावर संपर्क साधावा. दरम्यान, या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना आयोजकांच्या वतीने विशेष ‘सहभाग प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले

“युवकांना रोजगाराचे हक्काचे व्यासपीठ आणि दर्जेदार संधी मिळवून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देऊन आपल्या तरुणांच्या हाताला काम आणि कौशल्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करावी.”

— शंकर जगताप
(आमदार – चिंचवड विधानसभा)

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago