Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड मध्ये पुणे मेट्रोची घाईत ट्रायल … चंद्रकांत पाटील आणि महापौर माई ढोरे म्हणाल्या …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जानेवारी) :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील मेट्रोचा पाहणी दौरा आयोजित केला. मेट्रोची संपूर्ण माहिती त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेप नाही, मात्र पुण्याचे एवढे आमदार, खासदार, महापौर कुणीही तिथे नाही आणि पवारच मेट्रोची ट्रायल घेण्यासाठी कसे काय जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

Google Ad

▶️महापौरांनी ही केला आरोप :-
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनीही शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे, पण शहरात आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, खासदार श्रीरंग बारणे तसेच महापौर आणि आयुक्त कुणीही तिथे नाही आणि पवारच मेट्रोची ट्रायल घेण्यासाठी कसे काय जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक सन्मा. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कोणत्याही प्रकारचे वैधानिक पद नसलेल्या तसेच ठराविक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेऊन महामेट्रोचा मनमानी कारभार सुरु असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या लोकशाही परंपरेला छेद देणारी पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांची संपूर्ण कृती ही लोकशाहीचा अवमान करणारी आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही त्या यावेळी बोलल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!