Categories: Uncategorized

किवळे गावच्या विकासासाठी आम्ही शंकरभाऊंसोबत; ग्रामस्थांचा एकमुखाने निर्णय … शंकर जगताप यांनी घेतला ग्रामस्थांचा आशीर्वाद

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २४ ऑक्टोबर : सामाजिक बांधिलकी जपत गावातील एकोपा अबाधित राखणारे गाव अशी आमच्या किवळे  गावची ओळख आहे. २५ वर्षांपूर्वी आमचे गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झाले. स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या कार्यकाळात आमच्या गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले. किवळेतील १८ मीटर डीपी रस्त्यांसह अंतर्गत स्त्यांचा प्रश्न  शंकरभाऊंनीही पुढाकार घेऊन मार्गी लावला. त्यामुळे गावाचा अशाच पद्धतीने यापुढेही विकास व्हावा, यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने आणि एकदिलाने शंकर जगताप यांच्यासोबत राहू, असे आश्वासन किवळे ग्रामस्थांनी दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी गावभेट दौऱ्यानिमित्त किवळे गावातील ग्रामस्थ आणि नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी नागरिकांनी अगत्याने स्वागत करून महाविजयाचा आशीर्वाद दिला.

या भेटीदरम्यान माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, माजी नगरसेविका  सुमन नेटके, संदीप तरस, उमेश सांडभोर, बाबासाहेब सांडभोर,  सचिन सांडभोर, संदीप सांडभोर,  राजेश सांडभोर, कैलास कातळे, समीर कातळे, संजय कातळे, मोरेश्वर कातळे, बाळकृष्ण कातळे, सदाशिव कातळे, तुकाराम तरस, अतिश तरस,  सुधीर साळुंखे, नवनाथ तरस, भरत तरस, विश्वंभर गायकवाड, नवनाथ लोखंडे, बाळू तरस, अशोक तरस,  गौतम गायकवाड, बाळासाहेब धुमाळ, किरण धुमाळ, सुरेश धुमाळ, गणेश धूमाळ, नितीन तरस, बापू तरस, विजय तरस, दिपक तरस,  निलेश तरस, गणेश जुनवणे, संदीप काळे, सुदाम तरस, अजय उर्फ बिटू लंगे, अंकुश जाधव, मोहन कदम, अंकुश कुदळे, अलका पांडे, विलास तरस, आयुष तरस, बैलगाडा मालक आदेश तरस, विष्णू तरस, रोहिदास तरस, दिलीप दांगट, राजेंद्र तरस, शुभम दांगट, राजेश दांगट, हुमानत अण्णा बगालर, संजय चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.

याप्रसंगी अनिल चव्हाण, गोरख तरस, रवींद्र कडू, दत्ता काटकर, मारुती पवार, विशाल तरस, दशरथ साळुंके, ओबीसी सेल अध्यक्ष प्रदीप बिलगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील असंख्य युवा  कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश :-

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत किवळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब धुमाळ, सुरेश धुमाळ, प्रसाद धुमाळ, गणेश धुमाळ, किरण धुमाळ यांच्यासह असंख्य युवकांनी यावेळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

“चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने जो विकास झाला तो स्व. लक्ष्मणभाऊंच्या माध्यमातून झाला. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम शंकर जगताप यांनी यशस्वीपणे केले. त्यांनी मागील दोन वर्षात भाजप पक्षवढीसाठी आणि चिंचवडच्या विकासासाठी सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने काम केले आहे. त्यांच्या याच कार्यप्रणालीने प्रभावित होऊन आम्ही हा पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता पक्षप्रवेश करून न थांबता किवळे गावच्या विकासासाठी शंकरभाऊंनाच आमदार करणार असल्याचे”, त्यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन …. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन  - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…

2 days ago

एकाच तिकीटावर मुंबईकरांना सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरता येणार’

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…

4 days ago

महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट…* *आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त लेफ्टनंट शिवराज मोरे यांचा सन्मान..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…

2 weeks ago

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या वतीने … पिंपळे गुरव परिसरात २० हजार नागरिकांना दिनदर्शिका वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…

3 weeks ago

स्वच्छतेमुळेच पेशंट बरे होण्यास मदत होते – नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…

3 weeks ago