महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन दिवस पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरवमधील अंध अनाथ कल्याण केंद्रातील दिव्यांग मुलांसाठी खास ठरला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सौ पल्लवीताई महेश जगताप यांनी आपल्या भागातील ममता अंध अनाथ कल्याण केंद्र येथे रक्षाबंधन हा पवित्र आणि भावनिक सण साजरा केला. भावंडांच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या या दिवसाचे औचित्य साधत, त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या केंद्रातील निरागस मुलांशी रक्षाबंधनाचा आनंद शेअर केला. त्यांच्या डोळ्यांतील आनंद, हास्य आणि प्रेमाची भावना हीच खऱ्या अर्थाने या सणाची खरी ओळख असल्याचे यावेळी दिसून आले.
यावेळी सौ.शितलताई आगरखेड, सौ.मीनाताई दळवी, सौ.पुनमताई इनामदार, तुषार कांबळे सर उपस्थित होते. सर्वानी राखी बांधून रक्षाबंधन सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. या छोट्याशा हृदयस्पर्शी उपक्रमामुळे शिक्षक आणि उपस्थित सर्वजण भारावून गेले.
यावेळी बोलताना ‘पल्लवी जगताप’ म्हणाल्या, “आमचे प्रेरणास्थान गुरुवर्य लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, अश्विनीताई लक्ष्मण भाऊ जगताप, आमचे आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ममता अंध अनाथ कल्याण (दिव्यांग) केंद्र येथे आम्ही *रक्षाबंधन* हा पवित्र आणि भावनिक सण साजरा केला. या मुलांच्यास डोळ्यांतील आनंद, हास्य आणि प्रेमाची भावना हीच खऱ्या अर्थाने या सणाची खरी ओळख आहे. मला या दिवशी मिळालेला अनुभव हृदयात कायमचा कोरला जाईल…!! मुलांच्या निरागस गप्पा आणि त्यांच्या डोळ्यांत झळकणारी चमक ही आमच्यासाठी सर्वात मोठी भेट होती. सण साजरा करणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू नव्हताच, तर खऱ्या अर्थाने मुलांना त्यांच्या लाडक्या बहिणीची उणीव जाणून न देणे आणि त्यांच्याशी भावनिक नातं निर्माण करणे हा मुख्य हेतू होता अस ही त्या यावेळी म्हणाल्या.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…