महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जानेवारी) :-कॉन्सन्ट्रिक्स कंपनीकडून शाळेला लागेल ती मदत केली जाईल, कंपनी सतत अशा अनेक स्लममधील शाळांना सीएसआर निधीच्या माध्यमतून मदत करत असते, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला लागेल ती मदत आमच्या कंपनीकडून केली जाईल असे मत कॉन्सन्ट्रिक्स कंपनीचे मा. निश्चल अग्रवाल यांनी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय ,शिशुविहार मॉडर्न नर्सरी ,श्रीमती सुंदर भाई भानसिंग हुजा गुरुगोविंद इंग्लिश मीडियम स्कूल सांगवी आयोजित 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
आमच्या कंपनीकडून शाळेला इमारतीचे रंगकाम करण्यात आले असून नवीन वीस संगणक, चार प्रोजेक्टर, अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, वाचनालय व तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन 200 बेंच देण्यात आले आहेत. त्याचे आज उद्घाटन ही करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानाने समृद्ध होऊन नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात. विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे साहित्य कवायत, सांस्कृतिक कार्यक्रम ,मनोरे सादर केले त्यांचे मी मनापासून कौतुक करतो.
भविष्यात शिक्षणासाठी तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या आम्हाला सांगा आम्ही त्या पूर्ण करायचा निश्चित प्रयत्न करू असे ते म्हणाले व त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्रशांत शितोळे व कॉन्सन्ट्रिक्स कंपनीचे मा. विक्रांत पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आबासाहेब जंगले हे होते .
या कार्यक्रमाला कॉन्सन्ट्रिक्स कंपनीचे मा. संजीव भारद्वाज, मा. विक्रांत पांडे, मा. सिद्धार्थ अंचालकर ,मा. अनिर्बन गोस्वामी, थिंक शार्प फाउंडेशनचे अध्यक्ष मा. संतोष फड, मा. अमित कुतवळ ,माजी महापौर माई ढोरे ,संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले ,कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, खजिनदार रामभाऊ खोडदे ,सचिव तुळशीराम नवले ,सदस्य प्रकाश ढोरे ,मनीष पाटील शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने ,इंग्रजी माध्यम प्रमुख शोभा वरठी, माध्यमिक प्रमुख शितल शितोळे ,शिशुविहार प्रमुख संगीता सूर्यवंशी, नर्सरी प्रमुख शितल गरसुंड ,सर्व शिक्षकवृंद,सेवकवर्ग शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा. शिवाजीराव माने यांनी केले व निवेदन व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…