Categories: Uncategorized

भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले हे शक्तीप्रदर्शन पोटनिवडणुकीत लक्षवेधी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २२ फेब्रुवारी) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. २२) वाकडमध्ये चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो केला. उघड्या गाडीतून लोकांना अभिवादन करत निघाले तेव्हा नागरिकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. विशेषतः तरुणाईची तुफान गर्दी उसळली होती. “कमळ फुलू दे”च्या घोषणाबाजीने तरूणाईने एकच गलका केला होता. या रोड शोमुळे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. रोड शो दरम्यान सर्व रस्ते तुडूंब भरले होते. भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले हे शक्तीप्रदर्शन पोटनिवडणुकीत लक्षवेधी ठरले.

मुख्यमंत्री वाकड येथील दत्त मंदिराजवळील उत्कर्ष चौकात येताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फुलांची बरसात करत त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रोड शोला सुरूवात केली. दत्त मंदिर रोडने थेरगावमधील डांगे चौक, दत्तनगर जुना जकात नाका, चिंचवडमधील चापेकर चौक, गांधीपेठ पॉवर हाउस चौक, केशवनगर, काळेवाडीतील एम. एम. हायस्कूल, कुणाल हॉटेल पासून पुढे विमल गार्डन समोरून शिवेंद्र लॉन्सपर्यंत त्यांनी भव्य रोड शो केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी पुढे येऊन हस्तांदोलन केले. त्यांची छबी मोबाईल कॅमेऱ्याने टिपताना लोक दिसत होते.

मुख्यमंत्र्यांसोबत रोड शोमध्ये भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षाचे अनेक नेते सामील झाले होते. भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार भरत गोगावले, आमदार उमा खापरे, भाजप प्रवक्ते एकनाथ पवार, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप-रेणुसे यांच्यासह भाजप, शिवसेना व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

रोड शोच्या मार्गावर नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले, मुख्यमंत्र्यांच्या रोड शोनिमित्त महायुतीच्या वतीने संपूर्ण मार्ग भगवेमय करण्यात आले होते. त्यांच्या रोड शोला तुफान गर्दी उसळली होती. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. रस्त्याने ठिकठिकाणी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत होता. रोड शोमध्ये कमळ फुलू दे आणि भाजपच्या विजयाच्या, महायुतीच्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.रोड शोच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. मुख्यमंत्रीही कधी हात उंचावून, तर कधी हात जोडून मतदारांना अभिवादन करताना दिसत होते.

 

Maharashtra14 News

Recent Posts

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…

5 hours ago

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 month ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago