Categories: Uncategorized

26 पक्षांची एकजूट, विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं..! आता युपीए नव्हे तर ‘INDIA’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जुलै) : बंगळुरू येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधाकांची आघाडी तयार करण्यात आली आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील झाले असून या आघाडीचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

नावाची अधिकृत घोषणा लवकरच होणार :

बंगळुरू येथे विरोधकांच्या वतीने दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. याच बैठकीत विरोधकांच्या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात – Indian, N National, D – Democractic, I- Inclusive, A- Alliance असं हे नाव आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

इंडियामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम सारखे तब्बल 26 राजकीय पक्ष सामील झाले आहे.

विरोधी पक्षाच्या या बैठकीदरम्यान सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी तब्बल दोन वर्षांनी एकमेकांना भेटल्या आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात देखील चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसने पंतप्रधान पदावरची दावेदारी सोडली आहे. ही आघाडी सत्तेसाठी किंवा पंतप्रधान पदासाठी नसल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलं आहे.दरम्यान, विरोधकांची ही बैठक सुरू असताना दिल्लीत सत्ताधाऱ्यांची देखील बैठक सुरू झाली आहे. बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहे. सत्ताधाऱ्यांच्या बैठकीमध्ये काय चर्चा होईल? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…

1 week ago

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 month ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

2 months ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 months ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago