महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११-ऑक्टोबर) : देशभरात नवरात्र-दसऱ्याचा सण साजरा होत आहे. या सणांबाबत लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. रावण दहन देखील दरवर्षी मोठ्या थाटामाटात केले जाते.
यावर्षी या निमित्ताने ‘लोकनेते लक्ष्मण जगताप’ मित्र परिवाराच्या वतीने भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महाभोंडला आणि रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ‘चांडाळ चौकडी’ चे लोकप्रिय रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव या कलाकारांची टीम सांगवीच्या पी डब्लू डी मैदानावर रावण दहनासाठी पोहोचणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या करिता महाभोंडला कार्यक्रमाची ही जय्यत तयारी करण्यात आली आहे.
दसऱ्याला रावण दहन करून आपण प्रभू श्रीरामाचा विजयोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतो. या दिवशी प्रभू श्रीरामाने कात्यायनी देवीची पूजा करून रावणाशी युद्ध पुकारले. रावणाच्या बलाढ्य सेनेला तोंड देत दशाननाचा वध करून श्रीरामाने रामराज्य स्थापन केले.असे म्हणतात, की रावणाचा वध झाला नसता तर कायमचा सूर्यास्त झाला असता. परंतु तसे झाले नाही, तरी विजयाचा सूर्य उगवला आणि तो तेजाने चमकत राहिला.
रावण दहन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षित करते. यंदा लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवीच्या PWD मैदानावर दसऱ्या निमित्ताने महिलांच्या करीता महाभोंडला आणि रावण दहन शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून साजरा केला जाणार आहे. यावेळी ६१ फुटी रावणाचे ‘दहन’ यावेळी करण्यात येणार आहे. महिलांच्या बालपणातील स्मृतींना उजाळा मिळावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून महाभोंडला खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.
PWD मैदानात या रावणाला पाहण्यासाठी आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी लहान मुलांनी गर्दी केल्याचे पहायला मिळत असून या विशेष दिवशी बाहेर जाऊन उत्सवाचा आनंद घेण्याची संधी शंकर जगताप यांच्या वतीने पिंपरी चिंचवडकरांना आहे. दसऱ्याच्या उत्सवाचा आनंद घेता येईल. तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रपरिवारासोबत नक्की भेट देऊ शकता.
शहरातील भगिनींना महाभोंडला मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या ग्रुप चे नाव भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कृष्णा चौक, नवी सांगवी येथील कार्यालयात आणि याhttp://99605 01888 मोबाईल नंबर वर नाव नोंदणी करण्याचे आवाहन लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…