Categories: Uncategorized

संगीवीत रंगला पिंपरी-चिंचवड मधील सर्वात मोठा महाभोंडला व रावणदहन सोहळा..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ ऑक्टोबर) : देशभरात शनिवारी (दि.१२) विजयादशमीचा उत्सव साजरा झाला. ठिक-ठिकाणी रावण दहन करण्यात आले. राजधानी दिल्लीतही वेगवेगळ्या ठिकाणी रामलीला कार्यक्रम आणि रावण दहन आयोजित करण्यात आले होते. यात पिंपरी चिंचवड शहरही कमी नसल्याचे पहायला मिळाले.

गेल्या नऊ दिवसांपासून संपूर्ण देशात उत्साहाने व भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील पी डब्लू डी मैदानावरील अनेक वर्षाची परंपरा असलेल्या रावण दहनाने आणि महिलांच्या महाभोंडल्याने नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली.

यावेळी लोकनेते लक्ष्मण जगताप मित्रपरिवाराच्या वतीने व शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, कोयता गँग, अनिष्ट प्रथा, महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी, प्रदूषण अशा प्रतीकात्मक रावणाच्या प्रतिमेचे दहन केले गेले. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिकानी गर्दीचा उच्यांक केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव  यांच्या चांडाळ चौकडीच्या करामती ने तर उपस्थित प्रेक्षकांना अकक्षरशा खेळवून ठेवले, महिलांनी पारंपरिक भोंडला, दांडियाची कला सादर केली, मयूर ग्रुप अकॅडमी च्या कलाकारां उपस्थितांनी वन्स मोर करत डोक्यावर घेतले, तर डी जे च्या तालावर तरुणाई थिरकल्याचे पहायला मिळाले.

तसेच मयूर डान्स अकॅडमीच्या मानसी भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केलेल्या ‘रामयणा’वर आधारित कथ्थक नृत्य तर ‘दम दमा दम’ या रिऍलिटी शोचे विजेते नृत्य कलाकार यांनी तानाजी मालुसरे यांच्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ थीमवर आधारित नृत्य सादर केले. यावेळी महाभोंडला कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला ग्रुपला आयोजकांच्या वतीने विशेष भेटवस्तू देण्यात आले.

या सर्व कार्यक्रमात उपस्थितामध्ये लाखोंच्या गर्दीत एकच आवाज होता “अब की बार शंकरभाऊ आमदार …”

Maharashtra14 News

Recent Posts

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…

1 day ago

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 month ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 months ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago