Google Ad
Education

पिंपरी चिंचवड मनपाच्या जनसंवाद सभेत नागरिकांच्या त्याच त्याच तक्रारींचा पाढा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येक (सोमवारी) सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.

महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी सातवी जनसंवाद सभा पार पडली. नेहमी प्रमाणे प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात वेळेनुसार सकाळी दहा वाजता जनसंवाद सभेला सुरवात झाली होती. यावेळी सभेला मुख्य समन्वय अधिकारी पर्यावरण विभाग सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, स्थापत्य अभियंता विजयसिंह भोसले, पाणीपुरवठा अभियंता चंद्रकांत मोरे आदी विभागातील अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

Google Ad

जनसंवाद सभेला एकूण २३ तक्रारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी, फुगेवाडी दापोडी आदी परिसरातील तक्रारी घेऊन जनसंवाद सभेला नागरीक उपस्थित होते. यामध्ये गेली सहा जनसंवाद सभेत दापोडी येथील ड्रेनेज लाईनच्या तक्रारी येत होत्या. त्याचे वेळोवेळी सूचना देऊनही आजतागायत संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारींची दखल न घेतल्याने समन्वय अधिकाऱ्यांनी भर सभेत अधिकाऱ्यांना फटकारले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा सूचना करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली त्वरित तक्रारींची दखल घेऊन कामे मार्गी लावण्यास सांगण्यात आली. यावेळी अनेक नागरिक परत परत त्याच तक्रारी करताना दिसून आले.
———————————————-
मी सभेतच दापोडी येथील ड्रेनेज लाईनच्या तक्रारी दर सोमवारी वाढत असल्याने तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून काम होत नसल्याने जाब विचारला. यावेळी वरिष्ठ अधिकारी राणे आणि तांबे यांच्या अधिपत्याखाली त्वरित ड्रेनेज लाईन दुरुस्ती कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
संजय कुलकर्णी, मुख्य समन्वय अधिकारी, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय
———————————————-
साई चौक येथे असणाऱ्या भाजी मंडईत महिलांच्या करीता स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात यावी. स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे गुरव भागात झालेल्या कामाचा राडारोडा उचलून घेण्यात यावा. साई चौक ते फेमस चौक प्रलंबित रस्ता नागरिकांच्या करीता तात्पुरता डांबरीकरण करण्यात यावा, कृष्णा चौक येथे स्मार्ट सिटीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी काँक्रीट रोडला रस्ता संपतो त्या ठिकाणी रॅम्प करावा, सांगवी पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत तसेच गतिरोधकास पांढरे पट्टे मारावेत, सांगवी ते औंध डी मार्ट कडे जाणाऱ्या नवीन पुलाच्या बाजूस असणाऱ्या भिंतीवर रंगरंगोटी करून प्रभोधनपर घोषवाक्य व चित्र काढण्यात यावीत.

डॉ. देविदास शेलार
———————————————-
दापोडी येथील आई उद्यानात पाण्याअभावी झाडे, वेली सुकून जात आहेत. येथील उद्यानात साफसफाई होत नसून फुकट पगार वाटला जात आहे.
संजय (नाना) काटे, माजी नगरसेवक
———————————————-
कासारवाडी भागातील माजी नगरसेवकांचे नावाचे फलक काढण्यात यावेत.
शेखर लांडगे, नागरिक

———– ——————–

नवी सांगवी येथील अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा बाजूस अनधिकृत वाहने पार्किंग होत असल्याने ती हटविणेत यावीत.

शहाजी पाटील, नागरिक

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!