महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ डिसेंबर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी बाबा आढाव यांनी अखेरचा श्वास घेतला. कष्टकऱ्याचा आणि श्रमिकांचा आवाज ही त्यांची ओळख होती.
गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज (08 डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. असंघटीत कामगारांच्या हक्कांसाठी झटणारा नेता हरपल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील पुना रुग्णालयात 10 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. हृदयाशी संबंधित समस्येमुळे बाबा आढाव यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते आणि त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. बाबा आढाव यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः रुग्णालयात त्यांच्या भेटीसाठी पोहचले होते. यावेळी शरद पवार यांनी वैद्यकीय पथकाकडून बाबा आढाव यांच्या तब्येतीची माहिती जाणून घेतली, तसेच परिवाराशी देखील संवाद साधून त्यांना धीर दिला होता. मात्र आज बाबा आढाव यांचे निधन झाले.
1970 मध्ये बाबा आढाव हे पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. 95 वर्षीय असलेले बाबा आढाव तत्कालीन समाजवादी पक्षाचे होते. रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून त्यांनी काम केले आहे. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाच्या माहिमेचे प्रणेते बाबा आढाव आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माथाडी कामगार नेते, सामाजिक समतेची चळवळ उभी करणारे, सत्यशोधक म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुती निवडून आल्यानंतर विरोधकांनी ‘ईव्हीएम’चा मुद्दा लावून धरला होता. याच ‘ईव्हीएम’विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेश उपोषणाला बसले होते. त्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र बाबा आढाव हे आपल्या उपोषमावर ठाम होते. अखेर तिसऱ्या दिवशी शरद पवार आणि अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्यासोबत भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर बाबा आढाव यांनी आपले आत्मक्लेश उपोषण मागे घेतले होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२० डिसेंबर : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस-ठाकरेसेनेला जोरदार धक्का…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ डिसेंबर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प उद्यानात एस.ओ.आर.टी.…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १६ डिसेंबर २०२५ :* महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, पुणे आणि…