Categories: Editor Choice

29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षण सोडतीची तारीख अखेर जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ जानेवारी : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचा नुकताच निकाल जाहीर झाला, त्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. आता त्याबाबतचा मुहूर्त ठरला असून, वेळ ठिकाणाबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर यासारख्या मोठ्या शहरांसह सर्वच महापालिकांमध्ये आरक्षणाची ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

कधी निघणार सोडत?

नगर विकास विभागाच्या पत्रानुसार, ही सोडत राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. मंत्रालयातील 6 व्या मजल्यावरील परिषद सभागृहात 22 जानेवारीला सकाळी 11 वाजेपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठीचे महापौरपद निश्चित केले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही अजित पवारांना मोठा धक्का देत भाजपनं एकहाती सत्तेचा सोपान गाठलाय. तर नागपूरमध्येही भाजपनं आपला गड अबाधित ठेवलाय. त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देत सत्ता खेचून आणली.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदेगटाने एकत्रितपणे लढत दिली होती. निकालांनुसार भाजपाचे 89 तर शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मुंबईसह राज्यातील तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजपनं विजयी घोडदौड कायम ठेवली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी राहणार, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. आरक्षणावरच उमेदवारांची निवड, राजकीय रणनीती, आघाड्या तसेच प्रचाराची दिशा ठरणार असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महापौर पद महिला- पुरुष अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय किंवा खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहणार का ?? याबाबत राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सत्ताकारणाची दिशा ठरवणारी ही बैठक आणि आरक्षण सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, संपूर्ण शहराचे लक्ष मंत्रालयातील या निर्णयाकडे लागले आहे.
Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारीला विशेष सभा

*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारीला विशेष सभा* *स्थायी समितीसह विविध…

11 hours ago

द न्यू मिलेनियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे लाठी काठी मध्ये वर्ल्ड रिकॉर्ड

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- २०/१/२०२६, नवी सांगवी प्रतिभा महिला प्रतिष्ठान, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम…

3 days ago

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये थेट या प्रवर्गाला.. महापाैर आरक्षण सोडतमुळे दिग्गजांना धक्का

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ जानेवारी : राज्यातील महापालिका निवडणुका झाल्या आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष…

3 days ago

‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे पिंपरी-चिंचवडकरांसोबत आमदार शंकर जगताप यांनी केले जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २० जानेवारी २०२६ : ढोल-ताशांचा निनाद, टाळ्यांचा गजर आणि उत्साहाची लाट…

4 days ago

बजाज पुणे ग्रॅंड टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहर सज्ज

बजाज पुणे ग्रॅंड टूर' आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहर सज्ज जागतिक क्रीडा मंचावर अधोरेखित…

5 days ago