Categories: Uncategorized

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले, तर कोण करणार बंडखोरी?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ ऑक्टोबर) : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ठरले असताना महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे राहणार, हे चित्र आज उशिरा स्पष्ट झाले . महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या चार महत्त्वाच्या मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा पिंपरी मतदारसंघातील तिढा सुटल्यानंतर आता चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातीलही तिढा सुटला आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सुटले आहेत.

भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अजित गव्हाणे, चिंचवडमधून राहुल कलाटे, तर पिंपरी  सुलक्षणा धर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी राहुल कलाटे यांच्या तिकीटासाठी जोरदार प्रयत्न केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे या मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

महायुतीने शहरातील उमेदवार जाहीर करून आठ दिवस झाले. परंतु, महाविकास आघाडीतील गोंधळ कायम होता. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही महाविकास आघाडीत चिंचवड आणि भोसरी मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली होती.

भोसरीत उद्धव गटाचे इच्छुक उमेदवार रवी लांडगे यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही समर्थकांनी सोशल मीडियावर “फिक्स आमदार” व “भावी आमदार” अशा पोस्ट केल्या होत्या, परंतु आजच्या यादीत रवी लांडगे यांचे नाव वगळण्यात आले. उमेदवारी न मिळाल्यामुळे भोसरीत आता लांडगे बंड करतील का, यावर चर्चा रंगू लागली आहे. महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला साथ देतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

तर चिंचवडमधून उमेदवारी मिळवण्यासाठी तिन्ही इच्छुक नेत्यांनीशरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत तिघांना एकमत करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या होत्या. त्यामुळं या तिघांचं एकमत झालं नाही तर पवार स्वतः एकाच्या नावाची घोषणा करणार होते. त्यानंतर आज चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर आता नाना काटेंच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. त्यानंतर आता नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago