शहरातील दहा पत्रकारांनी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले
पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून राज्यघटनेने पत्रकारांना दिलेले मूलभूत अधिकार जपणारी संघटना म्हणजे मराठी पत्रकार परिषद ____ सुनील गायकवाड ( संपादक : बातमी सम्राट )
जुन्या आणि नवीन पत्रकारांना एकत्र घेवून पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी लढत राहू ____ विनय सोनवणे ( अध्यक्ष : पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषद )
|महाराष्ट्र 14 न्यूज,| पिंपरी चिंचवड, दिनांक २ : मराठी पत्रकार परिषद सलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेमध्ये शहरातील दहा पत्रकारांनी आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी प्रवेश केला. डिजिटल आणि प्रिंट माध्यमात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया अध्यक्ष विनय सोनवणे यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांच्या मार्गदर्शनाखाली रेनबो प्लाझा, पिंपळे सौदागर येथे झालेल्या भेटी गाठी दरम्यान दहा पत्रकारांनी संघटनेचे सदस्यत्व स्विकारले. यावेळी नवीन सदस्यांना संघटनेची धेय्य धोरणे सांगून गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले.
मराठी पत्रकार परिषदेने गेल्या ८६ वर्षात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी केलेले कार्य तसेच सामजिक कार्याचा इतिहास उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांसमोर मांडला. महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृ संस्था असलेल्या संघटनेत आपण प्रवेश करतोय याचा आनंद यावेळी पत्रकारांनी व्यक्त केला.
अनंता इनगळे, संदीप दुसाने, सुनील गायकवाड, संभाजी बारबोले, राहुल जाधव, अमर चाकोतकर, योगेश वडमारे, भाऊसाहेब निकम, प्रियांका गायकवाड आणि सचिन पाटील हे पत्रकार पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदे सदस्य झाले. मराठी पत्रकार परिषद मुंबई चे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख साहेबांच्या संघटनात्मक धेय्य धोरणांना अनुसरून आणि विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, डिजिटल मिडिया परिषद राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पत्रकारांचा संघटनेमध्ये प्रवेश करून घेतला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष विनय सोनवणे आणि सचिव सागर सूर्यवंशी उपस्थित होते. जुन्या आणि नवीन पत्रकारांना एकत्र घेवून पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी लढत राहू असे सांगून लवकरच डिजिटल मिडियाची नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे अध्यक्ष विनय सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
” मराठी पत्रकार परिषदेचा कार्य आढावा समाजाला तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मिडियाचे कार्य लक्षात घेता आपणही या संघटनेचे सदस्य व्हावे असे वाटले. त्यामुळे डिजिटल मिडियाचे अध्यक्ष विनय सोनवणे यांच्याशी संपर्क साधून अधिकृत सदस्य झालो ”
______ अनंता इंगळे ( पत्रकार : राष्ट्रीय लोकराज्य न्यूज )
” शहरात काही पत्रकार संघटना आहेत त्या नवीन पत्रकारांना पत्रकार या दृष्टीने का पाहत नाहीत हे अनाकलनीय आहे. परंतु मराठी पत्रकार परिषद ही अधिकृत असून नवीन पत्रकारांना सामावून घेवून वार्तांकन करण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे. पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी आहे. पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून राज्यघटनेने पत्रकारांना दिलेले मूलभूत अधिकार जपणारी संघटना म्हणून शहरात मराठी पत्रकार परिषद सलग्न पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषद कार्य करीत आहे. त्यामुळे ही संघटना आपल्याला पत्रकारांची मातृ संघटना वाटते म्हणून आज सदस्य झालो आहे ”
______ सुनील गायकवाड ( संपादक : बातमी सम्राट )
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…