महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ सप्टेंबर) : इटली येथे झालेल्या आर्यनमॅन स्पर्धेत ‘स्वप्नील चिंचवडे’ (swapnil chinchwade) यांनी पिंपरी चिंचवड शहराचा झेंडा पुन्हा अटकेपार फडकावत त्यांनी ही स्पर्धा १३ तास २८ मिनिटे व दोन सेकंदात पूर्ण केली.
मागील वर्षी स्पेन ( बार्सिलोना) मध्ये झालेल्या स्पर्धेतही त्यांनी यश मिळवले होते. आज पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चिंचवड गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचा सत्कार केला. इटली येथे २१ सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत जगभरातून २३०० स्पर्धक सहभागी झाले होते, त्यामध्ये भारतातील २० तर महाराष्ट्रातील पाच जण होते.
या स्पर्धेत ४२ किलोमीटर धावणे, ३.८ किलोमीटर पोहणे आणि १८० किलोमीटर सायकलिंग असे तीनही प्रकार करावे लागतात. या तीनही प्रकारात ४२ वर्षीय स्वप्निल चिंचवडे यांनी बाजी मारली.. शुक्रवारी सकाळी पिंपरी चिंचवड शहरात ते आले. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाचे श्रेय त्यांनी आपले वडील पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चिंचवडे यांना देत त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…