Google Ad
Uncategorized

विज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोग करण्यासाठी सज्ज व्हावे… शिवाजीराव माने

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ फेब्रुवारी :- आजचे युग हे विज्ञानयुग आहे. विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोग करण्यासाठी या क्षेत्रात सज्ज असले पाहिजे व नवीन शोध घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर , नूतन माध्यमिक विद्यालय , शिशुविहर, श्रीम, सुंदर बाई भान सिंग हुजा गुरुगोविंद इंग्लिश मिडीयम स्कूल,सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन उदघाटन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब जंगले यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय वैज्ञानिक मा. सी व्ही रमण यांनी भौतिकशास्त्रातील पारदर्शी पदार्थातून प्रसार झाल्यानंतर प्रकाशाच्या किरणांमध्ये होणाऱ्या बदलाबाबत महत्त्वपूर्ण शोध लावला होता. यासाठी त्यांना 1930 चाली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता .हा पुरस्कार मिळवणारे ते भारतीय नाहीतर अशियातील पहिले वैज्ञानिक होते. त्यांच्या या शोधाच्या सन्मानार्थ 1986 पासून हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो . यासाठी1954 साली त्यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले होते.विज्ञान दिन साजरा करण्याचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरित करणे ,

Google Ad

विज्ञाना प्रति आकर्षित करणे व त्यांना सजग बनवणे हा आहे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रयोग तयार केले आहेत. यामध्ये स्काय बस, व्याक्युम क्लिनर, स्मार्ट सिटी, सौरऊर्जा, हायड्रॉलिक जेसीबी, वॉटर पुरिफाय, इत्यादी आकर्षक प्रयोग तयार केले होते. खरोखर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो असे प्रदर्शन शाळांमधून होणे ही काळाची गरज आहे असे संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले म्हणाले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव तुळशीराम नवले, खजिनादर रामभाऊ खोडदे इंग्रजी माध्यम प्रमुख शोभा वरठी, माध्यमिक प्रमूख शितल शितोळे,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन पाहण्याचा आनंद घेतला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन दत्तात्रय जगताप यांनी केली व आभार हेमलता नवले यांनी मानले हे प्रदर्शन भरवण्यासाठी विज्ञान शिक्षक श्रद्धा जाधव, भारती घोरपडे, सुचित्रा भोसले, सुरेखा ढोणे,सुनिता टेकवडे , हेमलता नवले, सिमा पाटील,मनीषा लाड, स्वप्नील कदम , चेतना शिंदे,दिपाली झणझने, संध्या पुरोहित , स्मिता कुळकर्णी, भाग्यश्री साखरे,संगीता सूर्यवंशी अश्विनी करे , नीता ढमाले, निर्मला भोईटे, कुसुम ढमाले, मनीषा गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!