Google Ad
Uncategorized

चऱ्होलीतील यशोभूमी सोसायटीत ‘पाणीसंकट’ महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष … रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मार्च) :  यशोभूमी सोसायटी, वडमुखवाडी, चऱ्होली या सोसायटीमधे पाण्याची समस्या गंभीर आहे. सदर सोसायटीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पाणी खूप कमी प्रमाणात मिळते. या सोसायटीच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत हानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रसाद आल्हाट यांना समक्ष सोसायटीमध्ये घेऊन जाऊन पाण्याच्या प्रश्नाची दाहकता प्रत्यक्ष दाखवली. मात्र, त्याबाबत आद्याप कार्यवाही झाली नाही.

यशोभूमी सोसायटीमध्ये २०० सदनिका आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितला आहे. दोन दिवसांमध्ये या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सोडवतो, असे आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Google Ad

तसेच, जोपर्यंत सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत महानगरपालिकेद्वारे या सोसायटीला टँकरने पाणी पुरवण्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे व टँकर चालू केले आहेत. दोन दिवसांनी जर या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर या सर्व महिला भगिनींना घेऊन जाऊन हंडा मोर्चा काढण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

 

चऱ्होलीमधील बऱ्याच सोसायटीमध्ये सध्या पाण्याची तीव्र समस्या जाणवत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने बिल्डर कडून हमीपत्र लिहून घेतलेले आहे. भामा आसखेडचा टप्पा क्रमांक पाच आणि सहा पूर्ण होऊन महानगरपालिका पूर्ण क्षमतेने जोपर्यंत पाणी पुरवत नाही तोपर्यंत विकासाकांनीच स्वखर्चाने पाणी पुरवायचे आहे. परंतु, ना बिल्डर पाणी पुरवतो ना पिंपर- चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवते आणि बिल्डरवर पाणी न पुरवल्यामुळे कोणती कारवाई केली जात नाही. त्यामुळे संबंधित बिल्डरवर भारतीय दंड संहिता कलम २०० प्रमाणे हमीपत्राचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे नोंद करावेत.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!