Google Ad
Uncategorized

पिंपळे गुरवला ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14न्यूज, (दि .३० डिसेंबर) : येथील बँक ऑफ महाराष्ट्र जवळील चौकात सामाजिक कार्यकर्त्या व प्रतिभा महिला पतसंस्थेच्या उपाध्यक्षा शोभा जांभुळकर यांच्या वतीने आयोजित केलेल्या न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी अश्विनी लक्ष्मण जगताप, शुभांगी शंकर जगताप, सामाजिक कार्यकर्त्या शोभा जांभुळकर, शिक्षण मंडळ सभापती माधवी राजापुरे, नगरसेविका उषा मुंढे, शहर भाजपा पदाधिकारी उज्वला गावडे, पल्लवी जगताप, कावेरी जगताप, रवीना आंगोळकर, सुषमा कदम, डॉ. सीमा ननवरे, दिपाली जगताप, सुजाता कांबळे, वैशाली जवळकर, किरण नवले आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Google Ad

यावेळी क्रांती नाना मळेगावकर यांच्या ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत स्पर्धेचा आनंद लुटला. स्पर्धेत राखी वाजानी, वर्षा नेटके, प्रतिभा टिळेकर, प्रतिभा पाटील, सायली चौगुले आदी विजेत्या महिलांनी मानाची बक्षिसे पटकावली.

सहभागी महिलांनाही आकर्षक पारितोषिक देऊन यावेळी गौरविण्यात आले. चांडाळ चौकटीच्या करामती या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकारांनी उपस्थिती दर्शवत नागरिकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे संयोजन भाऊसाहेब जांभुळकर, ज्ञानेश्वर जांभूळकर यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!