Google Ad
Uncategorized

नवी सांगवीतील कृष्णा चौकात अवैधरित्या स्पा सेंटरच्या नावाखाली आठ महिलांकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या दोन इसमांविरुध्द गुन्हा दाखल!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ डिसेंबर) : ” सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवैधरित्या स्पा सेंटरच्या नावाखाली आठ महिलांकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या दोन इसमांविरुध्द कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त  कृष्ण प्रकाश , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक ३१/१२/२०२१ रोजी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या कारवाई करण्यात आली आहे .

Google Ad

दिनांक ३१/१२/२०२१ रोजी सामाजिक सुरक्षा पथक व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील बिंडल स्पा अॅण्ड ब्युटी फ्लॅट नंबर ११ , दुसरा मजला , शाहु पॅलेस , किर्तीनगर , कृष्णा चौक , नवी सांगवी , पुणे येथे स्पा सेंटरचा चालक मालक पार्थ महंती तसेच स्पा सेंटरचा मॅनेजर नामे शेख लतीफ हे महिलांकडून स्पा सेंटरच्या नावाखाली जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत घेतात .

वेश्यागमनासाठी स्पा सेंटर चालक – मालक व मॅनेजर हे प्रतिग्राहक २,५०० / – रु ते ३,००० / – रु घेतात व त्यातुन महिलांना वेश्यागमनाचा मोबदला म्हणून प्रत्येकी १,००० / – रु देवुन वेश्याव्यवसाय चालवितात . अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सामाजिक सुरक्षा पथक व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत सायंकाळी १६:१० वा चे सुमारास स्पा सेंटरमध्ये डिकॉय कस्टमर पाठवुन वेश्या व्यवसाय चालतो अशी खात्री होताच सापळा रचुन छापा टाकुन एकुन ०८ पिडीत महिलांची त्यामध्ये ०३ नेपाळ या परदेशातील महिला , आसाम , पश्चिम बंगाल , दिल्ली या पर राज्यातील ०४ महिला व राज्यातील ०१ अशा एकुण ०८ पिडीत महिलांची वेश्याव्यवसायातुन सुटका करण्यात आली.

या महिला सुधारगृह हडपसर , पुणे येथे ठेवण्यात आले आहे व खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त केला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे . ” २ ) १५,००० / – रु किं चे ०२ अॅण्ड्रॉईड मोबाईल . १ ) ८,३०० / – रु रोख रक्कम ३ ) ३७ / – रु किं चे इतर साहित्य . असा एकुण २३,३३७ / – रु किं चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नामै १ ) शेख लतीफ निजाम वय २७ वर्षे ( स्पा मॅनेजर ) रा . चवण हिप्परगा ता . देवणी जि . लातूर सध्या रा . सतिश देशमुख यांचे भाड्याचे रुममध्ये , ज्ञानदिप कॉलनी , कुणाल हॉटेलच्या पाठीमागे , काळेवाडी , पुणे तसेच पाहिजे आरोपी नामे २ ) पार्थ सारथी महंती वय अंदाजे ३६ वर्षे रा . ब्रिडल स्पा अॅण्ड ब्युटी फ्लॅट नंबर ११ , दुसरा मजला , शाहु पॅलेस , किर्तीनगर , कृष्णा चौक , नवी सांगवी , पुणे येथे स्पा सेंटरमध्ये मुळपत्ता श्रीरंगपूर , पोस्ट श्रीजंग जि . बालासुर पोलीस स्टेशन खांतापाडा राज्य ओडीसा यांचेविरुध्द सांगवी पोलीस स्टेशन येथे गुरनं ०१/२०२२ अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १ ९ ५६ चे कलम ३,४,५ सह भादंवि कलम ३७० ( ३ ) ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सांगवी पोलीस स्टेशन करीत आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!