Google Ad
Uncategorized

सांगवीच्या शिव जिजाऊ प्रतिष्ठानमधील तनिष्का सदस्यांनी केली अनोख्या पद्धतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक ०३ जानेवारी) :  सांगवी तनिष्का सदस्यांनी सावित्रीबाई फुले जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली. बा. रा. घोलप विद्यालयाच्या ब्युटी थेरपी अँड ॲस्थेटीक्स विभाग प्रमुख प्रा. रूपाली रसाळे, समन्वयक डॉ. माया माईनकर, प्रा. नम्रता पवार, सकाळ तनिष्का व्यासपीठाचे सागर गिरमे, सकाळ तनिष्का सांगवीच्या गटप्रमुख तसेच शिव जिजाऊ प्रतिष्ठान च्या शीतल शितोळे व इतर तनिष्का सदस्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रा. रूपाली रसाळे यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये व्यायवसायिक अभ्यासक्रमांतर्गत चालणाऱ्या ब्युटी थेरपी अँड ॲस्थेटीक्स कोर्स विषयी माहिती महिलांना दिली. ब्युटी थेरपीकडे महिलांनी फक्त एक गरज म्हणून न बघता व्यवसाय व रोजगाराची सुवर्णसंधी या दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत सौंदर्य क्षेत्रातील महिलांसाठी उपलब्ध असणार्यास करिअरच्या संधी यावर मार्गदर्शन केले.

Google Ad

समन्वयक डॉ. माया माईनकर, यांनी महिलांसाठी बा.रा. घोलप महाविद्यालयामार्फत चालविण्यात येणारे स्पोकन इंग्लिश व व्यक्तिमत्व विकास कौशल्य, बॉडी मसाज, फॅशन डिझाईन इत्यादि कोर्सेसची माहीती तसेच या क्षेत्रात उपलब्ध असणार्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. नम्रता पवार यांनी ब्युटी थेरपी अँड ॲस्थेटीक्स विषयात असणारा सखोल अभ्यास याविषयी मार्गदर्शन केले. श्री. सागर गिरमे यांनी तनिष्का या सावित्रीचा वसा कश्याप्रकारे पुढे चालवत आहेत याविषयी काही समाजिक व व्यावसायिक क्षेत्रात काम करणार्या तनिष्का सदस्यांची उदाहरणे देवून महिलांना प्रोत्साहित केले.

मा. शीतल शितोळे यांनी सवित्रीबाईंचे कार्य सांगत सांगवी परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्याय सवित्रींचे कौतुक केले. मा. प्रशांत शितोळे यांनी कोरोना सारख्या साथीच्या विरोधात लढत कलियुगातील तनिष्का सावित्रींना व्यवसायातील संधी यावर मार्गदर्शन केले. सावित्रीच्या वेशात आलेली छोटी सावित्री स्तुती पुरी हिने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच संस्कृती कुलकर्णी हिने मी सावित्री बनून सावित्रीबाईंचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान शीतल शितोळे यांनी भूषविले, सूत्रसंचालन मनीषा पुरी यांनी केले तर राधिका घोडके यांनी मान्यवरांचे व उपस्थित तनिष्का सदस्यांचे आभार मानले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!