नृसिंह हायस्कूलच्या विकासात संस्थेच्या विश्वस्तांचे महत्त्वपूर्ण योगदान … विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार सादर करून स्नेहसंमेलनाचा घेतला आनंद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ जानेवारी) : मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सांगवी या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महापौर माई ढोरे तसेच सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे ,गुन्हे अन्वेषण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे याचबरोबर स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग प्रमिला जाधव ,शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षा शितल सोमवंशी , प्राचार्य अशोक संकपाळ व उपप्राचार्य रमेश घुमटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माजी महापौर माई ढोरे म्हणाल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कला जोपासली पाहिजे तसेच आपले आई-वडील व शाळेचे नाव उज्वल केले पाहिजे. नृसिंह हायस्कूलच्या विकासात मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे .

संस्थेचे संस्थापक शामराव कदम, प्रमुख विश्वस्त एकनाथराव ढोरे व विश्वस्त भास्करराव पाटील यांनी ही संस्था स्वतःच्या पगारातून दिलेल्या आर्थिक योगदानातून उभा राहिली आहे. यानंतर सुनील टोणपे व सुनील तांबे यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्राचार्य अशोक संकपाळ यांनी अहवाल वाचन केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक बक्षीस मिळाले.

कार्यक्रमात यानंतर विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार सादर करून स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला. सर्व पालक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मनापासून प्रशंसा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खांदवे व राजश्री ढोरे यांनी केले तर नामदेव तळपे यांनी सर्वांचे आभार मानले संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन शरद ढोरे, प्रदीप पाटील, नितीन कदम ,क्षितिज कदम यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

2 days ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

1 week ago

जीवनात प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून भंडारा डोंगर येथील मंदिर उभारणीसाठी एक कोटींची देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ :  जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…

3 weeks ago

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…

3 weeks ago