Google Ad
Uncategorized

माजी महापौराचे नाव वापरून २ जणांनी व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ मार्च) : पुण्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने दोघांनी खंडणी मागितली या संबंधी संदीप पाटील, शेखर ताकवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून २ जणांनी व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी ३ कोटी रुपये द्या म्हणून खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. दरम्यान राजेश व्यास यांनी या संदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Google Ad

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर “कॉल मी ” नावाचे एक अॅप डाऊनलोड करून त्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या अॅप द्वारे समोरच्या व्यक्तीला असे भासवले गेले की हा खरंच मोहोळ यांचाच नंबर आहे. तसेच आरोपींनी मोहोळ यांच्या मावसभावाचा देखील नंबरचा गैरवापर केला.

या दोघांनी या अॅपचा वापर करत पुण्यातील व्याव्यासिकला फोन करून भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमाला पैसे लागणार आहेत. यासाठी ३ कोटी रुपये द्या असे सांगून खंडणी मागितली. हा सगळा प्रकार खोटाअसल्याचे लक्षात येताच त्या व्यावसायिकाने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ मोबाईल क्रमांकावरून शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!