Google Ad
Education Maharashtra Pune District

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. यावर्षी दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकालाची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे. ८ मे रोजी म्हणजे उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

Google Ad

निकालासंदर्भात सकाळी ११ वाजता राज्य मंडळ कार्यालयात शिक्षण मंडळाकडून अधिकृत पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहायला मिळेल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता उद्याच्या निकालाकडे लागले आहे.

दहावीचा निकाल कुठे पाहाल?

https://results.digilocker.gov.in

https://www.mahresult.nic.in

https://sscresult.mkcl.org

https://mahahsscboard.in

दहावीचा निकाल कसा पाहाल?

– सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या http://ma या वेबसाईटला भेट द्या.

– होमपेजवर लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा सीट नंबर आणि आईचे नाव टाकून माहिती भरा.

– त्यानंतर ‘VIEW RESULT’ या बटनावर क्लिक करा.

– यानंतर तुमचा निकाल तुमच्यासमोर ओपन होईल.

– रिझल्टची प्रिंट काढून घ्या.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!