Google Ad
Uncategorized

सोसायटीवरील ‘ॲमिनेटीज्‌’ कर आकारणी रद्द करा! – चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनची मागणी – महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले निवेदन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 मे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून सोसायट्यांमधील ओपन पार्किंग, खुल्या जागा, खेळाची मैदाने, क्लब हाऊस तसेच इतर ‘ॲमिनेटीज्‌’वर मालमत्ता कर आकारण्यात आल्याने शहरातील सोसायटीधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या कर आकारणीचा तातडीने फेरविचार करून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी चिखली–मोशी–पिंपरी–चिंचवड सोसायटी फेडरेशनने केली आहे.

या संदर्भात फेडरेशनच्या वतीने महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोसायटी परिसरातील खुल्या व सामायिक स्वरूपाच्या जागांवर अशा प्रकारे स्वतंत्र कर आकारणी करणे अन्यायकारक असून, यामुळे प्रामाणिक करदात्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

Google Ad

फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवत सांगितले की, “सोसायटीधारक नियमितपणे मालमत्ता कर भरत असताना ओपन पार्किंग, गार्डन, खेळाची मैदाने आणि क्लब हाऊस यांसारख्या सुविधांवर वेगळा कर लादणे चुकीचे आहे. हा प्रकार तातडीने थांबवून लावलेला कर रद्द करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

या मुद्द्यावर महानगरपालिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र या कर आकारणीविरोधात सोसायटी फेडरेशनने एकत्रित भूमिका घेतल्याने शहरात या विषयावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
****

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून सोसायट्यांमधील ओपन पार्किंग, गार्डन, क्लब हाऊस आणि खेळाची मैदाने यांसारख्या सामायिक सुविधांवर स्वतंत्रपणे ‘ॲमिनेटीज्‌’ कर लादणे हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. सोसायटीधारक आधीच नियमित मालमत्ता कर भरत असताना त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकणे योग्य नाही. हा निर्णय तातडीने रद्द करून फेरविचार करण्यात यावा; अन्यथा नागरिकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली–मोशी–पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!