Google Ad
Uncategorized

ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन … पिंपरी चिंचवड पत्रकार संघ देशातील पहिला पत्रकार संघ विभागीय सचिव ‘नाना कांबळे’ यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ मार्च) :पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सदस्य असलेल्या वय वर्ष साठ वर्षावरील ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा किमान पाच हजार रुपयाचे मानधन देण्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नाना कांबळे यांनी केली.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर नाना कांबळे बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे निवडणूक अधिकारी बाळासाहेब ढसाळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष प्रवीण शिर्के, मावळते अध्यक्ष अनिल वडघुले, डिजिटल मीडिया विंगचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत साळुंखे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष अविनाश अदक नवनिर्वाचित सरचिटणीस रोहित खर्गे डिजिटल मीडियाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष राजू वारभुवन, नवनिर्वाचित उपाध्यक्ष माधुरी कोराड, गणेश मोरे, नवनिर्वाचित कोषाध्यक्ष राम बनसोडे व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

Google Ad

यावेळी बोलताना नाना कांबळे म्हणाले की, पत्रकार संघाचे साठ वर्षावरील ज्येष्ठ सदस्यांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघ दरमहा किमान पाच हजार रुपयांचे मानधन देणार आहे असा उपक्रम राबविणारा पिंपरी चिंचवड पत्रकार संघ हा देशातील एकमेव पत्रकार संघ ठरणार आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे अध्यक्ष शरद पाबळे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे निमंत्रक गोविंद वाकडे या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पत्रकार संघ भक्कमपणे वाटचाल करत आहे.पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने लवकरात लवकर पत्रकार भवन च्या भूमिपूजनाचे नियोजन करण्यात येणार असून पत्रकार कॉलनी साठी म्हणून शासनाकडे पाच एकर जागेची मागणी करण्यात आली आहे ही जागा प्राप्त झाल्यानंतर जवळपास 80 पत्रकारांना स्वतंत्र बंगले बांधून देण्याचा मनोदय असल्याचेही नाना कांबळे यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने देशातील पहिले प्रिंट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे महाविद्यालय उभे करण्याचा मनोदय ही नाना कांबळे यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वीपणे पार पाडले त्याच धर्तीवर नजीकच्या काळात महिला पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन भरविण्याचा प्रयत्न असून देशभरातील महिला पत्रकारांना या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने येत्या महिनाभरात पत्रकार प्रशिक्षण उपक्रम अंतर्गत आठ दिवसाचा प्रमाणपत्र प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे यासाठी अनेक मान्यवर पत्रकार मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याचेही नाना कांबळे यांनी यावेळी सांगितले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!